Thursday, 14 January 2010

प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं.... ''काचेची बरणी आणि दोन कप चहा ''

आयुष्यात जेंव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी
कराव्याशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेंव्हा काचेची बरणी
आणि २ कप चहा आठवून पहा.

तत्वज्ञानाचे
प्राध्यापक वर्गावर आले.त्यांनी येताना काही वस्तू बरोबर आणल्या
होत्या.तास सुरु झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर
ठेवली आणि त्यात ते पिंग्पौन्ग्चे चेंडू भरू लागले.ते भरून झाल्यावर
त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले.मुले हो म्हणाली.मग
सरांनी दगड खड्यांचा डबा घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी
हलवली.बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जावून
बसले.त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं.मुलांनी एका
आवाजात होकार भरला.सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत
ओतली.बरणी भरली.त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले.मुलांनी
ताबडतोब हो म्हंटल.मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले दोन कप आणि तेही
बरणीत रिकामे केले.वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पूर्ण भरून
निघाली.विद्यार्थ्यांमध्ये एकाच हशा पिकला.तो संपताच सर म्हणाले,"आता हि
जी बरणी आहे तिला तुमच आयुष्य समजा.पिंग्पोन्ग्चे चेंडू हि महत्वाची
गोष्ट आहे-देव,कुटुंब,मुलं,आरोग्य,मि
त्र आणि आवडीचे छंद_या अशा गोष्टी
आहेत कि तुमच्याकडचे सांर कांही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी
तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल.दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची
नोकरी,घर आणि कार.उरलेलं सार म्हणजे वाळू __म्हणजे अगदी लहान सहान
गोष्टी.
''आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपोंगच्या चेंडू किंवा
दगड-खडे यांच्यासाठी जागा उरणार नाही.तीच गोष्ट आपल्या आयुष्याची.तुम्ही
आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान-सहान गोष्टींवर खर्च केलीत तर
महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच राहणार नाही.तेंव्हा......
आपल्या सुखासाठी महत्वाचे काय आहे त्याकडे लक्ष्य द्या.
''आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा.मेडिकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ
काढा.आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा.घराची साफसफाई करायला आणि
टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल.
"पिंगपोंगच्या चेंडूची काळजी आधी घ्या.त्याच गोष्टींना खर महत्व
आहे.प्रथम काय करायचं हे ठरवून ठेवा.बाकी सगळी वाळू आहे."
सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेलं.तिनं विचारलं,"यात
चहा म्हणजे काय?"
सर हसले नि म्हणाले,"बरं झालं तू विचारलंस.तुझ्या प्रश्नाचा अर्थच असा
कि आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्रांबरोबर एक-दोन कप चहा
घेण्याइतकी जागा नेहमीच असते."
आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर हा विचार वाटून घ्यावा.
मी तर आताच केलं ते!
संकलक:राजेश गोखले

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....