Thursday, 14 January 2010

०२-०९-२००९

०२-०९-२००९
अगदी पहिल्यापासून सुरुवात करून म्हणजे वडील वारल्यानंतर मी वाईट वागलो परिणाम म्हणून मला घरच्यांनी अंतरावर ठेवले.कालांतराने पुन्हा जवळ आलो-दूर गेलो या सर्व प्रकारात सर्वस्वी चूक माझीच आहे.माझे व्यसनच जबाबदार होते.
आईकडून अथवा भावाकडून निर्णय घेण्याबाबत कांही चुका झाल्या असतील,त्यांनी त्या मान्यही केल्या पण माझ्या डोक्यातून जात नाहीत.
नातेसंबंधात रिसोर्स मध्ये मनी,मटेरियल,मॅन अशी सामान्यपणे आपण अपक्ष करतो,त्या फक्त आताशा दिसू लागल्या.मला व्यसन काळात ज्याची फार गरज होती तेंव्हा सुरक्षा,विकास या बाबींची मी अपेक्षा केलेलीच असणार पण उलट मी देखील त्यांची केवळ दारू न पिणे एवढीच अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.
असे असले तरी,केवळ व्यसनमुक्ती केंद्रात admit करणे व फॉर्मवर सही करणे यापलीकडे कांही त्याना काम आहेत कि नाही?
माझ्या बाबतीत दुसरा एक गैरसमज आहे कि हा मुद्दाम करतो.मला खरेच कांही गोष्टी इथे आल्यावर कळल्या,अजूनही बरेच कांही कळायचे आहे.तेंव्हा मी खरच असा का वागलो?का वागतो?याचा कधी तठस्थपने विचार केला नाही.
केला तर बहुदा एकांगी,पूर्वग्रहदुषित,दोष देत, कारण किती दिवस असे व्यसनमुक्ती केंद्रातच राहणार?
आणि महत्वाची गोष्ट कदाचित वस्तुस्थिती पेक्षाही खरी आहे कि,मला बाहेर एकही मित्र,वगैरे नाही,समाजात किंमत शून्य आहे,तेंव्हा नाती आहेत ती तोडण्यापेक्षा टिकवलेली बरी.आणि सध्यातरी 'आय कॅमॅनेज' हे विसरून स्वतःचे शहाणपण बाजूला ठेऊन स्वतःकडे तटस्थपणे बघता येईल का?दुसर्यांचे ऐकता येईल का?इथे जे सांगतात त्यावर शांतपणे विचार तरी करता येईल का?हे पाहीन कारण बर्याच गोष्टी तात्पुरत्या समजल्यासारख्या वाटतात,पण कृतीची वेळ आली कि,राग,असंयम उफाळून येतो. नमस्कार,
तुम्ही लिहिल्यानुसार मला विचारायचं आहे कि,अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर इतर कोणत्याच गोष्टींची तुम्हाला गरज वाटत नाही का?
अशा मानसिकतेत राहण हि बधिरता आहे कि अपरिहार्यता?तुम्हाला कोणी मित्र नाही,जवळचे जीव लावणारे नातेवाईक नाहीत हि परिस्थिती कशी वाटते?यात तुम्ही खुश आहात का?का याचा त्रास होतो आहे?
स्वतःचा शोध घेता येतो का?कि त्यात कृतीचा आळस मध्ये येतो?
इथे बसून भविष्यात आपल्याला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल याचा विचार करून त्या परिस्थितीत काय आपण वागू शकू याचा विचार करा।
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....