Thursday, 14 January 2010

04-09-2009

०४-०९-२००९
मला स्वतःबद्दल विचार केला असता,माझ्या व्यसनमुक्तीच्या प्रामाणिकपणा बद्दलच स्वतःविषयी शंका येऊ लागली आहे कारण आज rebt च्या तासात एक मुलगा,पुष्कर कामात,जो काल कुणाला न सांगता 'कृपा'बधून निघून गेला,त्याचे उदाहरण मॅडमनी दिले आणि विचारले कि,समजा तुम्हाला दोनदा विनंती करूनही फोन करू दिला नाही,अशा परिस्थितीत त्याच्या जागी तुम्ही काय कराल?
इतरांनी विविध उत्तरे दिले.मी सांगितले,'मला त्याची विशेष आवश्यकता वाटत नाही' वरवर हे विवेकी उत्तर आहे.पण वस्तुस्थिती अशी आहे कि,खरेच सर्व परिस्थिती अनुकूल असती,तर मी काय केले असते?
मॅडमनी सांगितले कि,अनकन्फर्ट एण्झायटी चे हे परफेक्ट उदाहरण आहे.
त्या अनुषंगाने मी कामतपेक्षा वेगळा ठरत नाही.कारण मला फक्त माझा स्वार्थ हवा आहे,दिखाऊ सहानुभूती हवी आहे,त्याचबरोबर सर्वांत राहूनही 'आय एम डिफरंट' हा अविवेकी पूर्वग्रह कुरावाळायचा आहे,तसेच माझ्या फटकळपणाला स्पष्टवक्तेपणाचा आणि अकार्यक्षमता किंवा न्यूनगंड झाकण्यासाठी एकलकोंडेपणाचा बुरखा हवा आहे.
हे झाले वस्तुनिष्ठ परीक्षण पण माझ्यात सगळ्यात मोठा दोष जाणवतो तो असा कि,प्रत्येक गोष्ट फार उतावीळपणे किंवा खोलवर विचार न करता करतो त्यामुळे कदाचित त्या त्या बाबींचे महत्व किंवा गांभीर्य मला कळत नाही.

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....