Monday, 18 January 2010

२५-०९-२००९
आज कोणीतरी विचारले कि,काय मुक्काम वाढला का?मी होय म्हंटले.कारण मला इथे करमते.इथेच काय पण कोणत्याही रीहॅब मध्ये करमते याचेही कारण आहे.
एकतर बाहेरचे कोणतेही टेन्शन इथे नसते.दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही 'रीहॅब सेंटर' च्या दिनक्रमाव्यतिरिक्त जो वेळ असतो त्यात हि म्हणजे आम्ही मंडळी काय करतो?
तर जे दारू पिऊन गुत्त्यात करतो तेच करतो!दारू पिऊन आम्ही सतत शिवीगाळ,मारामारी करतो,अविवेकी वागतो असा कुणाचा समज तर तो अत्यंत चुकीचा आहे.
* इथे आम्ही तत्वज्ञानावर बोलतो.
# तिथेही बोलत [बरळत होतो!]
* इथे नॉनव्हेज जोक्स सांगतो,ऐकतो.
# तिथेही तेच करत होतो.
* इथे एकमेकांची टिंगलटवाळी उखाळी-पाखाळी करतो.
# तिथेही तेच!
* इथे एकमेकांच्या सुखदु:खाचे बोलतो.
# तिथेही तेच करतो.
*इथेही त्याच त्याच सिनेमा,नाटक,राजकारण कोणत्याही विषयावर गप्पा..
# तिथेही तेच!
प्रवृत्ती अगर वृत्ती सारखीच!तर हे झाले आपले नमनाला घडाभर तेल!माझी एक विनंती होती कि,आतापर्यंत मी कधी स्वतःविषयी,किंवा विवेकी-अविवेकी वर्तन किंवा व्यसनाचे मानसशास्त्र यासंबधी कांही वाचन केलेनाही.
औरंगाबादला 'शांती क्लिनिक' मध्ये मी दाखल असताना मनोविकारासंबंधी थोडे वाचले पण मनोविकासाविषयी कांही माहिती,बेसिक्स असणारी पुस्तके वाचण्याची माझी इच्छा आहे.कारण रोज दोन-तीन तास तरी अगदी आरामात मोकळे मिळतात.मग बोअर होणे किंवा उगाच तवली करण्यापेक्षा तोच वेळ थोडा सत्कारणी लावला तर काय हरकत आहे?म्हणून कृपया अशा पुस्तकांची नावें सुचवावीत मी भावाला आणायला सांगेन.
कारण याआधी शिव खेरा,वामनराव पै,उमेश कणकवलीकर यांचे व्यक्तिमत्व विकासासंबंधी पुस्तके कांहीजण वाचत.ते मलाही 'वाचत जा' असे सांगत.
मी त्यांना म्हणायचो,किंवा इतिहासातील रुसो वगैरेंचे दाखले देऊन सांगायचो कि,"अरे, दारुड्याला कुठे व्यक्तिमत्व वगैरे कांही असतं का?"असे कांही कांही सांगून तेही कधी वाचले नाही.
पण आता खरी मेख कळली आहे कि,हे सर्व वाचण्यासाठी देखील व्यक्तिमत्वाची ओळख तरी व्हायला, पटायला हवी!
नमस्कार,
गेल्या दोन्ही qt ला हे उत्तर आहे.स्वतःच्या स्वभावाचे,सवयींचे तुम्हाला विश्लेषण करता येते.परंतु आता या 'सत्त्याचे' पुढे काय?पुढे काय करायचं याचा पुढचा काहींच प्लान तुमच्याकडे कधीच दिसत नाही.आपल्या स्वभावदोषांवर आपण कांहीतरी काम केले पाहिजे असा कधी विचार केल्याचे मला आठवत नाही.
स्वार्थीपणा आणि स्वहित यामध्ये तुमची जर गल्लत होत असेल तर आपण एकदा प्रत्यक्ष याविषयावर बोलूया.
तुम्हाला प्रत्येक रीहॅब मध्ये करमतं असं तुम्ही म्हणतात.कारण बाहेरच्या आणि इथल्या वातावरणात किंवा तुमच्या वागण्यात फारसा बदल नसतो हे जरी मान्य केले तरी त्यातील फरक मला असा वाटतो कि, बाहेर आपण व्यसनाकडे आज न उद्या वळतोच.आपल्याबरोबर इतरांचेही आयुष्य धोक्यात आणतो.आणि परत कांही दिवसांनी "रीहॅब" मध्येच येतो. इथे नक्कीच कांहीतरी चांगलं आणि वेगळं घडतं.
प्रत्यक्ष बोलूया.
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....