२३-०९-२००९
पुन्हा आज मी जे कांही वागत आलो आहे,त्याचा संदर्भ कुठे,कसा लागतो आहे का?याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.दिशा कदाचित योग्य नसेल पण मला जसे समजते तसे मी लहानपणापासून एखादी जबाबदारी घेण्यास असमर्थ आहे.किंवा मला एखादी जबाबदारी दिली तर मी पार पाडू शकलो नाही.तर मी त्या ठिकाणी स्वार्थी दृष्टीकोनातून दुसर्यांची मदत घेतली.आणि काम झाल्यावर त्याला मी अलगद दूर केले.
उदा: लहानपणी मला वडिलांनी १ रूपाचे नाणे देऊन कांही वस्तू आणावयास [पान] पाठवले.मी ते नाणे उडवत,उडवत रस्त्याने जात होतो.रस्त्यात पाणी येण्यासाठी नळाचे खोल खड्डे केलेले असत त्यात ते नाणे पडले.पंचवीस वर्षाखाली एका रुयाला चांगलीच किंमत होती.
खड्डा बराच खोल होता.त्यात पाणी होते.त्यात उतरून नाणे काढायला मला भीतीही वाटत होती कारण त्यात बेडूकदेखील होते.म्हणून मी एका मुलाला दहा पैसे देण्याचे कबूल केले.तो पंचवीस पैसे म्हणाला,मी देतो म्हंटले. त्याने नाणे वर काढले. मी नाणे घेऊन पळून गेलो. वडिलांना त्या मुलाने तक्रार सांगितली.वडील मला रागावले देखील .
हा झाला लहानपणीचा किस्सा. मला जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडतो तोपर्यंत मी त्याच्याशी व्यवस्थित असतो.नंतर मी बोअर होतो.भलेही त्यादुसऱ्या व्यक्तीला मी आवडत असलो तरीही मी त्याच्या भावनांची फारशी किंमत करत नाही.
हे दोन मुख्य स्वभावदोष मला माझ्यात दिसतात.याला स्वार्थीपनादेखील म्हणता येईल.
पण आजपर्यंतचे माझे वर्तन आणि माझ्यावर हि परिस्थिती यातून मी स्वहित जपल्याचे कधीच दिसले नाही.स्वार्थीपणात प्रथम स्वहिताची तरी जाण असती.नेमका हाच गोंधळ मला समजत नाही.मला नेमके काय म्हणायचे असते याचे विश्लेषण मी योग्यप्रकारे करू शकत नाही.
कारण माझ्या व्यसनाधीनतेला सर्वस्वी मीच जबाबदार आहे.व्यसन करत राहणे हा पर्याय स्वीकारला तरी एक स्वतंत्र अस्तित्व मला का जप्त येत नाही?याचा मला उलगडा होत नाही.
खरे सांगायचे तर माझा निर्णय हा माझ्या पूर्ण शारीरिक,मानसिक आरोग्याबरोबरच पुढील भवितव्याशी निगडीत आहे.
म्हणून केवळ निर्व्यसनी राहणे हा सध्या एकच हेतू,पर्याय आहे.
No comments:
Post a Comment