Monday, 18 January 2010
तुतारी
एक तुतारी द्या मज आणुनी l
फुंकीन ती मी स्वप्राणाने l
भेदुनी टाकीन सगळी गगने l
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने l
आशि द्या मजलागुनी ll धॄ ll
अव्डंबरली ढगे किती तरी l
रवी किरणांचा चूर होतसे l
मोहोर सगळा गळून जातसे l
कीड पिकांवर सर्वत्र दिसे l
गाफील गिरी तरीही जगावरी ll १ ll
जुने जाऊ द्या मरणालागुनी l
जाळूनी किंवा पुरुनी टाका l
सडत न एक्या ठायी ठाका l
सावध ऐका पुढल्या हाका l
खांद्यास चला खांदा भिडूनी ll २ ll
प्राप्तकाळ हा विशाल मधुर l
सुंदर लेणी तयांत खोदा l
निजनामे त्यावरती नोंदा l
बसवूनी कां वाढवता मेदा l
विक्रम कांही करा चला तर ll ३ ll
संघशक्तीच्या भुईत खंदक l
रुंद पडणी शे तुकडे झाले l
स्वार्थानपैक्षी जीवी आपुले l
पाहिजेत ते सत्वर भरले l
घ्या उडया तर बेलाशक ll ४ ll
हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर l
शुरानो या त्वरा करा रे l
समतेचा ध्वज उंच धरा रे l
नीतीची ग्वाही पसरा रे l
तुतारीच्या या सुराबरोबर ll ५ ll
पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर l
तुंबळ संग्रामाला करिती l
संप्रति दानव फार माजती l
देवावर झेंडा मिरविती l
देवांच्या मदतीस चला तर ll ६ ll
केशवसुत
संकलन: प्रवीण कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
हंस-दमयंती
Dhingana
an alcoholic
- Pravin Kulkarni
- Pune, Maharashtra, India
- Hi.. I am Pravin and I am an alcoholic....
No comments:
Post a Comment