३०-०९-२००९
आज मॅडमनी आम्हाला बोलावून 4th स्टेप विषयी समजावले.त्यानुसार मी लिहिण्यास सुरु केले आहे.
त्यात माझ्या मनात आकसाची भावना, जी आता मी कॅरी करत नाही,किंवा त्याची तीव्रता,वारंवारता कमी झाली आहे,पण एखादे वेळी त्या किंवा विशिष्ट वेळेस मनात येतेच म्हणून मला लिहिणे आवश्यक वाटले.
बाह्य वातावरणात किंवा बाहेरचे लोक सदैवच मला चांगले मिळाले.त्यांचा मी कृतज्ञच आहे.
खरेतर घरच्यांनी देखील मला आधीच माफ केले आहे हे देखील मला माहित आहे.पण कित्येकवेळा मारहाणीचे, शिवीगाळीचे प्रसंग आले,कांहीवेळा मी पूर्ण blackout मध्ये असल्याने जसेच्या तसे लिहिता येत नाहीत.
तरी मी प्रथम 4th स्टेप वस्तुनिष्ठपणे न लिहिता त्या त्या प्रसंगात माझ्या भावना गुंतवून लिहिल्या कारण प्रसंग एकामागोमाग एक असे कांही आठवत नाहीत.किंवा दृश्यमालिका तयार होत नाही.पण सार निघू शकतो.त्यातून पुढे मला माहित असलेले कांही लहानपणातील प्रसंग आणि मी असा का वागत गेलो, माझे नेमके कुठे चुकत गेले? त्या त्या वेळी मी नेमके काय करू शकलो असतो हेदेखील पहात आहे.लिहिणे सध्या अर्धवट झाले आहे.पण ते उद्या दाखवीन व त्याविषयी बोलेन.
पण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मला एका गोष्टीचा प्रत्यय आला कि, मी जरी घरी, कौटुंबिक नातेसंबंध, विषेशत: आईसोबत जपण्यास पत्र ठरलो नाहीतरी नोकरीच्या ठिकाणी, किंवा इतरत्र मी ज्याला नॉर्मल म्हणू शकू या पातळी पर्यंत ठीक होतो.
कारण व्यसन जरी गृहीत धरले तरी लोक नुसती हुशारी पाहत नाहीत,तर बरेचसे वर्तनावर अवलंबून असते.म्हणून कदाचित माझे दारू पिणे मान्य करूनही कांही लोक मला 'आपला' समजत असावेत.असो.
नमस्कार,
तुम्ही 4th स्टेपविषयी जे लिहिले आहे त्यापेक्षा रीतसर 4th स्टेप करा.कारण नुसते प्रसंग आणि घटना लिहिण्यापेक्षा पूर्ण 4th स्टेप करा.
संगीता जोशी मॅडम
No comments:
Post a Comment