Wednesday 20 January 2010

इष्कात..:मराठी शायरी


सारखा होता पुढे चेहरा हसरा तिचा
होतो अशा मस्तीत जैसा वेणीतला गजरा तिचा
प्राशुनी बेधुंद होतो मदिरा तिच्या अधरातली
नव्हतो जसा दुनियेत होतो कल्पवृक्षाच्या तली
चांदणे नुसतेच होते जीवनी या पसरले
वाटले दुर्दैव जैसे साफ मजला विसरले
अर्थ दुसरा जीवनाचा कळलाच ना मजला कधी
आज तो कळला तसा ना
कळो कोणा कधी






नजरही ज्यांच्यावरोनी वाटले काढू नये
वाटते कि आज त्यांचे नावही काढू नये
दोस्तहो इष्कात साऱ्या हेच असते व्हायचे
नुसताच नाही इश्क सारा समजला आता मला
वैय्यर्थ साऱ्या जीवनाचा समजला आता मला
ना कुठे गेलो कुण्या साधूकडे ना पोचलो
नुसताच केला इश्क, आणि या पदाला पोचलो

जळलो असे इष्कात जैसे कोळसे झालो अम्ही
सागरी आता भवाच्या बुडनारही नाही अम्ही
समजू नका कोणास कांही भलते कधी सांगेन मी
उतरावया भवपार नुसता, इष्कही नाही कमी

भाऊसाहेब पाटणकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....