Wednesday 20 January 2010

इश्क:मराठी शायरी



हसतील ना कुसुमे जरी, ना म्हणतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती आमुची नव्हे
भ्रमरापरी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे,भिक्षुकी केली अम्ही


खेळलो इष्कात आम्ही,बेधुंद येथे खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कुणाच्या लोळलो
अस्मिता इष्कात साऱ्या, केंव्हाच नाही विसरलो
आली वेळ तशीही तेंव्हा इश्क सारा विसरलो

रडलो आम्ही इष्कात, जेंव्हा आम्हां रडावे वाटले
तेंव्हा नव्हे इष्कास जेंव्हा आम्ही रडावे वाटले
आसूवरी अधिकार हाही, इष्कात ज्याला साधला
नुसताच नाही इश्क, याला मोक्ष आहे साधला


बर्बादिची दीक्षा जशी इष्कात आम्ही घेतली
इष्कही बर्बाद करण्या, माघार नाही घेतली
ना रडू नुसतेच आम्ही, हाय ना नुसते करू
आहो शिवाचे भक्त आम्ही, हेही करू तेही करू

नव्हता तसा केविलवाणा, इश्क केंव्हा आमुचा
होता पुरे प्रणयात सारा, नुसता इशारा आमुचा
दोस्तहो, या अप्सरांनी नाही आम्हाला रडविले
रडविले जे काय अमुच्या संयमाने
रडविले
हे खरे आहो अम्हीही इष्कात या रडलो कधी
रडलो असे इष्कात नाही नयनासही कळले
कधी

भाऊसाहेब पाटणकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....