२१-०९-२००९
इथे मी काय वाचले,काय शिकलो याची पडताळणी करण्याचा एक योग आज आला.
आज आउटपूट च्या वेळेस पाऊस आल्यामुळे आउटपुट लवकर संपले.सहाजिकच एक छोटीसी डुलकी काढून झाली.
चहा झाल्यानंतर साध्रारण साडेचारला टीडीए नाही असे सांगितल्याने आम्ही व्होलीबोल खेळण्यासाठी खाली ग्राउंडवर आलो.घटना तशी क्षुल्लक [नाहीतरी इथे विशेष काय घडणार?असो.]
तर आम्हाला मोहित सरांनी सांगितले कि, जरी पाऊस आल्यामुळे टीडीए होणार नसला तरीही पाच शिवाय तुम्हाला खेळता येणार नाही.
साहजिकच आम्हा सर्वांत नाराजी पसरली.इतरांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.
परत आल्यावर माझी प्रतिक्रिया....
१. काय स्याडेस्टिक माणूस आहे? २ टीडीए घेऊ नका असे थोडेच आम्ही सांगितले होते?३ पावसापुढे काय करणार?४ लवकर खेळले तर काय बिघडते?
असे म्हणत वैतागत हॉलभोवती एक फेरी मारली,परत आपल्या पलंगावर येऊन पडलो.
पडल्या पडल्या पुन्हा तोच विचार...
आता या वेळेचे काय करावे?
हॉल मध्ये बुद्धिबळ चालते तर मैदानी खेळ का नाही?
टीव्ही चालतो तर व्हॉलीबॉल का नाही?
पाच मिनिटानंतर उठून,माझे बोट दुखावले आहे,त्याला मलम लावले.नंतर हॉल मध्ये आलो.टीव्हीवर सारेगामा लिटील चॅम्पस चालले होते.लहान मुलांनी फार छान गाणी म्हंटली चार गाणी ऐकली.
नंतर बिडीवाटप झाले.त्यानंतर झोनमध्ये एक मित्र आला. त्याला म्हंटले,व्हॉलीबॉल उशिरा खेळायला जाण्याचा एक फायदा झाला.चांगली गाणी बऱ्याच दिवसांनी ऐकता आली!
त्याने कपडे धुऊन झाल्याचे सांगितले.
यावरून उगाच कोणाच्या निर्णयांनी किती त्रास करून घ्यायचा किंवा घ्यायचा कि नाही हे कळते.
त्रास होतो हे निश्चित पण नंतर मी जर माझ्या व्यसनकाळातील मानसिकतेनुसार वागलो असतो तर, मी पुन्हा कधी खेळायलाच गेलो नसतो.
पण हे सर्व थोडे positively घेऊन, हा कदाचित प्रोग्रामचा भाग असू शकेल इथपर्यंत मानसिकता घेऊन सर्वांबरोबर खेळायला तर गेलोच आणि जिंकलोही.
घटना साधी असते पण मी त्याचा पूर्वी फार त्रास करून घ्यायचो.पर्यायी विचार किंवा विचारच मला करता येत नव्हते.शांत राहणे तर दूरच.
साध्या साध्या गोष्टी तर सोडाच पण महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीत किंवा बाबींत विचार असा नव्हता.फक्त एक आणि एकच प्रतिसाद/प्रतिक्रिया,ती म्हणजे दारू! हे समीकरण झालेहोते.
No comments:
Post a Comment