५-१०-२००९
खुद हि को कर बुलंद इतना
कि हर तकदीर से पहले
खुदा बंदेसे खुद पुछे
बता,तेरी रजा क्या है l
हे माझे आजच्या आउटपूट मध्ये तुमची उच्चशक्ती किंवा परमेश्वराची संकल्पना यावर उत्तर होते.
माझ्या मते,सकाळी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एखादा विचार,संकल्पना,थेअरी{उपपत्ती},निसर्ग,घटना आपली उच्चशक्ती असू शकते.
मात्र व्यक्ती हि उच्चशक्ती असू शकत नाही या मताशी मीही सहमत आहे कारण व्यक्ती चुका करू शकतात.व्यक्तीचे विचार उच्चशक्ती असू शकतात.
मला विचारण्यात आले, 'कृपा' मध्ये तुमची उच्चशक्ती कोण?
मी म्हणालो,माझे कौन्सिलर,अर्थात व्यक्ती म्हणून नाहीतर त्यांचे विचार म्हणून मी श्रेष्ठत्व मान्य केले आहे.आणि त्या विचारांवरही माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला किंवा विवेकाला पटेल अशी कृती होणे अपेक्षित असते.
कारण ३ऱ्या पायरीत आम्ही स्पष्टपणे म्हणतो कि,"आम्ही निर्णय घेतला कि आम्ही आमची इच्छाशक्ती व जीवन पूर्णपणे परमेश्वरावर सोपून द्यावे.' तेंव्हा यात 'निर्णय' आम्ही घेतो.तेंव्हा आम्हाला पूर्ण विश्वासच असतो, किंवा असायलाच हवा कि,या उच्चशक्तीकडून माझे निश्चितच भले होणार आहे.अर्थात त्यासाठी माझी विवेकबुद्धी मात्र जागृत हवी.त्या विचारांशी मी केलेले विचार तादात्म्य {सुक्ष्माती सूक्ष्म प्रत्यय} पावतील तेंव्हा मी अर्थातच स्वयंपूर्ण होईन.तोपर्यंत मी 'सरेंडर' असणे अपेक्षित आहे.
यावर जोशी सरांनी हे खरोखरच का वरवरचे आहे असे विचारले,त्यावर,तुम्हीदेखील माझे highpower , हितचिंतकच आहात असे सांगितले.
कोणाला काय वाटावे हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण भाऊ किंवा कुटुंबीय हे माझी उच्चशक्ती होऊ शकणार नाहीत कारण तेथे भावनिक गुंतवणूक असते.हा दुसरा मुद्दा.
तिसरा आणि महत्वाचा मुद्दा यासाठी कि, मी जेव्हा 'मुक्तांगण' मध्ये दुसर्यांदा दाखल झालो,तेंव्हा तेथील जोशी सरांना मी म्हंटले कि, आता मी परत परत डायरी वगैरे लिहिणार नाही.
ते म्हणाले, लिहू नको.पण माझे थोडे ऐक,त्यांनी एकच वाक्य मला सांगितले ,कांही दिवस घरात,माणसांत रहायला शिक.
डिस्चार्ज झाल्यानंतर मी घरी राहिलो पण 'माणसांत' नाही कारण अठरा अठरा तास नेट,टीव्हीवर मी नाटक, सिनेमा पहायचो.[त्याचे addiction ]
आई,बहिण,यांचा फ्लॅट जवळच असूनदेखील महिन महिना त्यांच्याकडे जायचो नाही.त्यांचे कांही प्रश्न असतील,कांही आनंदाचे क्षण असतील,असे वाटले नाही.मी व्यसन न करता दोन महिने घरात राहिलो पण माणसांत नाही.
याआधीतर पिऊन आल्यावर झोपणे,टीव्ही बघणे याव्यतिरिक्त घराचा संबंध नव्हताच.मग फरक काय पडला?
तर विचार चांगला असला तरी,स्वतःच्या विवेकबुद्धीने त्या विचारांशी सांगोपांग विचार करून त्यामागील भावना लक्षात घेऊन 'तादात्म्य' पावणे म्हणजेच मला समजलेली 'उच्चशक्ती'किंवा देवाची संकल्पना होय. असे मी मानतो.कारण कोणीही घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकेल,पण ते पाणी प्यायचे कि नाही हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते!
No comments:
Post a Comment