०७-१०-२००९
आज सकाळ पासूनच थोडाफार तब्येतीत फरक जाणवत होता करण हवामानात बदल झाल्याने अचानक खोकला,सर्दी,ताप आला होता. गोळ्या घेतल्यावर बरे वाटले. हेच मी दारू पीत असताना चार-चार दिवस गोळ्या-औषधे घेऊनही फरक कधी जाणवायचा नाही.कारण कुठलेही औषध दारूवर कसे काय काम करणार?
साध्या-साध्या दुखण्याचे मग दवाखान्यात admit होण्यापर्यंत वाढ होई.हा एक दारू सोडण्याचा फायदा मला कळला!
एवढ्या वर्षात काकांकडे एक वर्ष आणि एकदा २००४ मध्ये ७० दिवस,आणि गेल्या वर्षी दोन महिने एवढे वजा केलेतर सतत २१ वर्ष मी सतत दारूच पिली आहे.त्यामुळे सहाजिकच दारूशिवाय राहतानाचे फारसे अनुभव माझ्या पाठीशी नाहीत.त्यामुळे माझ्या विचारात कांही दुराग्रह असले तरी ते [विचार] पूर्णतः चुकीचे नव्हते असे वाटते.
कारण माझ्याव्यतिरिक्त माझ्यासंदर्भात सर्वांनाच 'घाई'होती.मला नोकरी लागणार हे निश्चित होते.तेंव्हा अडचणीच्या ठिकाणी,अडचणीच्या गावी घर बांधण्याची घाई,मला माहित होते कि ,नोकरीत आज न उद्या प्रमोशन नक्की मिळेल,तरी मुली शोधण्याची घाई,आता सद्यस्थितीत कांही करणार नाही म्हंटले तरी unfunctional होशील,म्हणून कांहीतरी कर.पण 'काहीतरीच' करण्यापेक्षा 'unfunctional ' राहिलेले काय वाईट?
कारण क्र.१ मला सांगण्यात येते कि, टाईमपास म्हणून एखादा जॉब कर.
क्र.२ नवीन कांही शिकायचे म्हणून कांही काम कर.
तर यासारखे हास्यास्पद सल्ले जेंव्हा मला नातेवाईकांकडून मिळतात तेंव्हा मला फार हसू येते कारण,मी जर एखाद्या फर्मचा मालक असतो तर कुणी मला नोकरी मागताना वरील करणे सांगितली तर मी त्याला सांगेन, वेळ जात नसेल तर बाहेर थिएटर,नाट्यगृह,बागा,प्रेक्षणीय स्थळे,अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे वेळ घालवता येतो!हि वेळ घालवण्याची जागा नव्हे!ठिकाण नव्हे!
क्र.२ बाबत असेच कि,तुला जर कांही नवे शिकायचे असेल तर क्लासेस लाव!आमचा वेळ पैसा का बरे वाया घालवतोस?
खरतर मी त्या त्या कामासाठी पत्र असणे,त्याबद्दल मला अपेक्षित मोबदला मिळणे हा सरळ व्यवहार आहे.
सद्यस्थितीत माझ्याकडे असे कौशल्य नाही.ते विसित करणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे.हे लिखाण वगैरे खरेच पोपटपंची,बकवास आहे.,हे मलाही मान्य आहे.पण आहे त्या नोकरीची कांही खबर नाही,जी प्रमाणपत्रे आहेत त्यांचा पत्ता नाही,एखादी झेरॉक्सप्रत नाही,एखाद्या वेळेस दारू पिल्यास कधीही रात्री-अपरात्री नेसत्या कपड्यानिशी बाहेर जावे लागेल,जवळ पैसा नाही अशा स्थितीत शांतपणे जे जे होईल ते ते पहावे आणि दारूच्या जंजाळातून लवकर बाहेर पडून स्वयंपूर्ण कसे लवकर होता येईल,पैसा मिळवण्याच्या क्षमता कशा विकसित करता येतील हे पाहणेच माझ्यासाठी महत्वाचे आहे.हिताचे आहे.त्यामुळे मागे तुम्ही लिहिल्याप्रमाणे माझ्या संवेदना सक्षम आहेत पण पैसा कमवणे,त्याप्ठी लागणे,त्यासाठी सक्षम होणे हे मला क्रमप्राप्त किंवा अपरिहार्य आहे असे वाटते.कारण सबसे बडा रुप्पया!
कुलकर्णी नमस्कार,
मी अनुराधा करकरे,तुमच्या वहीत लिहित आहे.
मला असे वाटते कि, तुम्ही follower होण्यापेक्षा स्वतंत्र विचार करणे पसंत करता.हि चांगली गोष्ट आहे.
तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे चला.तुमची सदसद्विवेकबुद्धी काय सांगते!त्याचे ऐका.आणि तुम्ही चांगले आयुष्य जगू शकाल.
करकरे मॅडम
No comments:
Post a Comment