Thursday, 14 January 2010

28-08-2009

२८-०८-२००९
आज पुन्हा स्वतःच्या बेजबाबदारपणा बद्दल विचार केला तेंव्हा आजच्या 'इनपुट' मधील रॅशनल सेल्फ चे पॅरामीटर्स चे आज जे ३ मुद्दे चर्चिले त्यातील 'शास्त्रीय दृष्टीकोन' माझ्यात आहे.मात्र लाँग रेंज हेडोनिजम,मजा घेण्याची दूरगामी वृत्तीचा अभाव आणि अनिश्चिततेचे तत्व या दोन मुद्द्यांच्या बाबतीत मी स्वतःला कमी समजतो.कारण मला क्षणिक सुख हवे असते.आणि सर्व कांही शाश्वत राहील याची खात्री हवी असते.हि चूक मला कळत आहे.
तसेच यासंदर्भात rebt च्या तासात मॅडमना विचारले असता त्यांनी सांगितले कि,तुम्हाला काय हवे असते तेच तुम्हाला ठाऊक नसते.तुमची अपेक्षा असते कि लोकांनी तुम्हाला समजून घ्यावे,पण नेमके काय करावे?तुम्हाला नेमके काय हवे हे तुम्हालाच माहित असणे हे प्रथम महत्वाचे आहे.
माझ्या संदर्भात हि दुसरी चूक मी मान्य करत आहे.कारण जरी कांही शारीरिक समस्यांमुळे मी सध्या काम करण्यास असमर्थ असलो तरी, मला काय काम करायचे आहे किंवा माझ्यासाठी कांही काम करण्यासारखे असू शकेल का?असे मी भावाला विचारले जरी असते तरी त्यांनाहि माझ्याकडून कांही सकारात्मक प्रतिसाद तरी मिळतो हे पाहून आनंद झाला असता,मात्र उलट मी कामच करणार नाही अशी भूमिका घेतली.त्यामुळे जरी शारीरिक अथवा काहीही कारण असले तरीही समोरच्याला किंवा त्रयस्थाला तो 'माज' असण्याचा प्रकार वाटणे संभवते.
तिसरा मुद्दा असा कि,जे कांही अविवेकी पूर्वग्रह असतात ते खोडणे किंवा आपण चुकीचे वागतो हे स्वीकारणेच मुळात जड जाते.असे बाहेर कोणी कांही सांगितले तर आज मी नक्की दारू पिली असती,कारण मला सत्य नको असते.पण माझ्या या अशा वागण्यामागे अजून कायकाय असू शकते?
कारण माझा अजून एक पूर्वग्रह खोडणे अवघड जात आहे,तो अस कि,भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची चिंता मला केलीच पाहिजे.
आणि सतत त्या चिंतेत रहायला मला आवडतेदेखील.याचा त्रास होतो कारण बऱ्याचशा गोष्टी घडतदेखील नाहीत!
नमस्कार,
तुम्ही जे कांही लिहिले आहे त्याचा मुद्देसूद विचार केल्यास असे लक्षात येते कि,बऱ्याच गोष्टी माहित असूनदेखील त्याचा कृतीत फारसा उपयोग होत नाही.नॉनफंक्शनल राहण्यात जरी एक प्रकारचा आनंद असेल तरी त्याच्या मागे स्वतःविषयी कीव,अपराधीपणाची भावना परंतु एक्स्प्रेशन लेव्हलला बेफिकिरी,चिंतामुक्त असण्याचा आव असण्याची शक्यता आहे.
तुम्हाला मुळात तुमच्यात बदल करावासा वाटतो का?जर यापूर्वीची परिस्थिती,म्हणजे कांही न करता बसून राहण्याचा पर्याय जर तुम्ही positively घेतला असता तर त्याचा तुम्हाला आणि इतरांना त्रास झाला नसता.परंतु तसं कधीच न दिसल्या कारणाने तुम्ही आपल्या वर्तनाचा पुन्हा विचार करावा.
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....