Wednesday 13 January 2010

26-08-2009

२६-०८-२००९
"तुम्ही स्वतःला जसे वागवता,इतरांना असे संकेत देत असता कि,'मला असे वागवा.''
हे मुलभूत वाक्य आहे.मी माझ्या संदर्भात हे वाक्य तपासून पाहतो तेंव्हा एक निष्क्रिय,ज्याला गृहीत धरता येते किंवा धरावे अशी अपेक्षा असते,असा मी किंवा 'भोपळ्यातले बी' अशासारखी प्रतिमा निर्माण होते.पण दोन्हीमागे मला कळून आले आहे की..
सर्वांना मी आवडतो,सर्वांनी माझ्यावर प्रेम करावे,अन्यथा ते भयानक आहे.
मी काहीही करायला नालायकच आहे.
हे अविवेकी विश्वास त्यामागे होते.ते खोडून काढणे अवघड आहे.पण कळले हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे,कारणही एक प्रक्रिया आहे.हळूहळू समजेलही.
अल्कोहोलने निश्चितच स्मरणशक्ती व आकलन क्षमतेवर थोडाफार परिणाम केला आहे.पण विचार करण्याची कुवत टिकून आहे.
आपण एकदा म्हणाला होतात कि,खरेतर आपल्या घरचे सांगत असतात कि,हा माणूस न पिता फार चांगला आहे.पण तुमच्याच म्हणण्यानुसार हा चांगला राहण्याचा भ्रमाचा भोपळा फुटतो हेही खरेच!
कारण मी सहज विचार केला कि,आपले गुण-दोष सांगताना मी सहज ८ते१० दोष सलग न थांबता सांगेन पण १० मिनिटे विचार करूनही मला एकही 'गुण' असल्याचे दिसत [आठवत] नाही.
हा अविवेकी विचार तर नाही ना?कारण गुण असवेत असे सर्वांचे म्हणणे असते.पण माझ्यात तर तसे कांही दिसत नाही.
उलट संधी मिळताच मी 'अवगुण' दाखवणार नाही कशावरून?
लोकांनी माझ्यावर विश्वास का ठेवावा?
मी कितीदा स्वतःशी तरी प्रामाणिक राहिलो आहे?
असे कितीतरी प्रश्न मला स्वतःविषयी पडतात.

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....