Wednesday, 13 January 2010

24-08-2009

२४-०८-२००९
हि गृहीतके मी मागेच गृहीत धरली होती.पण माझा त्यावरील विश्वास नाही,कारण माझ्या म्हणण्यानुसार जरी मी नोकरी आता गमावली तरी जी वडिलोपार्जित थोडीफार इस्टेट आहे त्यात कांही कारण नसताना वाटे वाढतात कारण बहिणीच्या लग्नात त्या त्या काळातील बाजारभावाप्रमाणे खर्च झाला आहे.तसेच आईलाही पेन्शन मिळते.त्यामुळे विनाकारण वाटण्या करून माझ्यावर अन्याय झाल्याची भावना माझ्या मनात होती. पण बराच विचार केल्यानंतर लक्षात येत आहे कि,जरी सर्व इस्टेट मला दिली असती तरी मी थोड्याच दिवसात तिचा निकाल लावला असता.
तसाही मी वेगळाच रहायचा प्रयत्न करत होतो.पण मी कोणते काम करू शकेन यावर माझा अद्याप विश्वास नाही.कारण तसे असते तर सोपी नोकरी सहजी सोडली नसती.पण छोट्या शहरात एखादा छोटा व्यवसाय सहज करता येईल असा विश्वास वाटतो.कारण जरी नाही चालला तरी किमान नुकसान कमी होते.तसेच नोकरी हि मलातरी कधी मानवणार नाही असे वाटते.
त्यामुळे पुन्हापुन्हा डोक्यात तेच विचार येतात कि आहे ती जमीन वगैरे विकून व्याजावर निवांत जगावे.पण सध्यातरी भाऊ आला होता त्याला power of attoerny करून दिलेली आहे त्याला सांगितले कि सध्यातरी विकू वगैरे नकोस.कारण सध्या थोडी मानसिकता बदलत आहे.त्यामुळे कदाचित दुसरा मार्ग निघून आर्थिक स्वायत्ततेचाही प्रश्न निकाली निघेल.
खरेच त्यामुळे इतरही बरेचसे प्रश्न सुटतील,किंवा मला स्वातंत्र्य मिळेल.कारण तो [आर्थिक अडसर] हाही एक अडचणीचा प्रश्न आहे.पण त्या स्वातंत्र्याला कांही मर्यादा मात्र जरूर आखून घ्याव्या लागतील.
नमस्कार,
मला हे जमणार नाही, मी ते करू शकणार नाही,यात कांही अर्थ नाही असा विचार किंवा मानसिकता तयार होण हाच एक अविवेकी विचार आहे.कारण आजपर्यंत विचार आणि कृतीच स्वातंत्र्य तुम्हाला कायमच होतं.आता मुद्दा असा आहे कि निष्क्रियतेची पुट एकदा चढायला लागली कि नवीन करण्याची इच्छा मरते.आणि पुन्हापुन्हा आळस,उद्दिष्ठहीनता,कदाचित नैराश्य याच चक्रातून आपला प्रवास होतो.त्यापेक्षा असलेल्या पर्यायामधून जरा नवीन पर्यायांचा विचार करून बघूया.कारण त्यामुळे अजून भयानक नुकसान काहीच होणार नाही.प्रगती तेंव्हाच होते,जेंव्हा कांही हालचाल असते.प्रयोग करून बघण्याची उर्मी असायला हवी.
संगीता जोशी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....