१८-०९-२००९
आज आपल्यापैकीच एक मित्र नितीन निधन पावल्याचे कळले.वाईट वाटले.थोडावेळ खिन्नही झालो.कारण फार नाहीतरी थोडीफार ओळख झाली होती.पण या प्रसंगाने मी माझ्या मनातील विरूप भावनांना ओळखले आणि जीवनाचे क्षणभंगुरत्व, त्याचा व्यसनाधीनतेशी संबंध, त्याची नाळ हे पाहून पुन्हा मी आजतरी तेथे नाही हे पाहून 'सुटकेचा नि:श्वास टाकला.
माझ्या मनात [गेल्या २ ते ४ दिवसात] नोकरीसंदर्भात विचार का येत होते हे मी तपासून पहिले.येथे संदर्भ ,अपेक्षा आणि मागणीचा आहे.याबाबत मी समक्षच बोलेन कारण सर्व लिहिण्याकरिता वेळ नाही.असो.तर मी स्वतःबद्दल विचार करण्यास थोडीफार सुरुवात केली आहे.
याआधी मी म्हणायचो,खुशवंतसिंगना एकदा अमृता प्रीतम म्हणाल्या होत्या कि, मी आत्मचरित्र लिहिणार आहे. तेंव्हा, खुशवंतसिंग हसून म्हणाले,"अगं,तुझ आयुष्याच ते केवढं?त्यात घडणार काय?एखाद्या रसीदी तिकिटावर लिहिलंस तरी पुरेल" यावर त्यांनी म्हणजे अमृता प्रीतमनी खरेच आपल्या आत्मचरित्राचे नाव 'रसीदी तिकीट ' ठेवले. 'दुर्दम्य' कार गंगाधर गाडगीळ यांनीही आपल्या आत्मचरित्राचे नाव 'एका मुंगीचे महाभारत' असे ठेवले;तेथे मी एक क:पदार्थ दारुडा माझ्या आयुष्यात असे काय असणार?"
यामुळे कधी मी स्वतःबद्दल लिहिणे तर दूर विचार देखील केला नव्हता.पण असे करणे म्हणजे अस्तित्वाला नाकारणे आहे हे मला पटू लागले आहे.मी स्वतःला स्वतःच्या कोशात बांधून व घट्ट विणून घेतले होते.तेथे मला उबदार व सुरक्षित वाटत होते.पण इ अवस्था किती दिवस सुसह्य होईल हे सांगता येत नाही.
कारण याधीही मी सहा महिने कामावर गेलो नाही काम सोडणार म्हंटले पण प्रथम qt मध्ये सांगितल्याप्रमाणे मला ते positively घेणे जमले नाही.नंतर जॉईन होऊन काम, व्यसनापायी करू शकलो नाही.या रीलॅप्स ला कारणीभूत घटना म्हणजे परत गावी जाऊन तेथील माहिती जाणून घेण्याची इच्छा, कारण मी जवळपास दीड ते दोन वर्ष अनधिकृत गैरहजर आहे.यावेळी संपूर्णत:नोकरी जाण्याचा संभव आहे.हे विचार का येतात तर त्यामागे "मी दुसरे कांही काम करण्यास असमर्थ आहे,किंवा मला त्याच ऑर्डर मधील पदोन्नती खुणावते आहे." यापैकी एक विचार तरी निश्चित आहे.
पण सद्यस्थितीत मला फक्त 'स्व' शी निगडीत, व्यसनाशी संबंधित, त्यावर अभ्यास आणि व्यसनापासून मन आणि कृतीने दूर राहायचे आहे.त्यामुळे पुस्तके वाचून माणूस शहाणा होतो यावर माझा फारसा विश्वास नाही.त्याला अनुभवाची जोड असलेले विचार ऐकण्याची सवय लागायला हवी.यासाठीआले मार्गदर्शनहवे.
No comments:
Post a Comment