Friday 8 January 2010

20-07-2009qt

क्वाईट टाईम
२०-०७-२००९
आज क्वाईट टाईम ला पहिल्यांदा basalo तेंव्हा नजर समोर dvd -vcd प्लेअरवर गेली.मनात वाईट वाटले कारण मी ऐडमिशन घेतेवेळी जवळ ६ dvd होत्या त्यात ३० दर्जेदार नाटके होती.कांही बघितलेली,तर कांही वाचली म्हणून बघण्यासाठी घेतलेली.पण थोत्द्याच वेळात विचार आला,कि आपण याक्षणी बाहेर असतो व्यसनमुक्त राहून त्याचा किंवा इतर नाटक सिनेमाचा आस्वाद घेतला असता का?तर उत्तर आपोआपच नाही असे आले.यावर मनातल्या मनात [नाहीतरी दुसऱ्या कुणाला यावेळी बोलत नाहीत!] कै.जयवंत दळवींची एक गोष्ट आठवली.ती संक्षिप्त मध्ये...
मुंबईतील एका उपनगरात एक 'काका' रहात असतात.ते रिटायर्ड झाले असले तरी त्यांना बंगाली जादू येत असते.त्याद्वारे ते माणसांचे प्राण्यात रुपांतर करू शकत असतात.त्याच गल्लीत एक स्टेनो कम टायपिस्ट मुलगी रहात असते.मीना तीच नाव.ती एक दिवस त्यांच्याकडे जाऊन म्हणते,"काका,मला या नऊ ते पाच रुटीनचा कंटाळा आलाय,शिवाय लोकलची दगदग,यापेक्षा मला चिमणी करा!"यावर काका तिला चिमणी करतात.सायंकाळी ती [मीना] काकांकडे येते आणि म्हणते,"काका,काय ते चिमणीच आयुष्य?मला स्वच्छंद बागडायचं होत तर किडेमुंग्या खाव्या लागल्या.मला ते नको.मला आपली मीनाच करा!"काका तिला पूर्ववत करतात.
हि झाली एक गोष्ट.दुसरीत एक वृद्ध आजोबा असतात,त्यांना चांगल्या ३ सुना नातवंडे असा परिवार असतो.मात्र परिवार पिंजरयातल्या पोपटाचे लाड करत असतो पण त्यांना 'क्रोनिक डिसेंट्री' असल्याने त्यांच्यावर वैतागत असतो.ते काकांकडे येतात.''मला पोपट [पिंजर्यातला] करा" म्हणतात.नंतर चौथ्या दिवशी ते पोपटाच्याच रुपात परत येऊन मला माणूस कराmhantat कारण जरी पोपटाचा देह दिला तरी व्याधी चुकवता येत नाहीत.पोपट फार घाण करतो म्हणून वैतागून त्याला घरचे हिरवी मिरचीच देत असतात.त्यामुळे त्रास जास्त होतो.लाडाऐवजी त्रासच होतो.
हि झाली २ री गोष्ट.३ र्या कथेत एक वासुगिरी करणारा मुलगा काकाकडे जातो व मला कुत्रा करा असे सांगतो.काका तसे करतात.मग परत लगेच संध्याकाळी येऊन मला मुलगाच करा म्हणतो.कारण कुत्रा होऊन बागेत जातो तर लहान मुले उगाच धोंडे मारतात.मग लंगडत लंगडत एका कुत्रीशी सलगी करतो.ती कुत्रीही त्याला दाद देते.पण त्याने समागमाची मागणी केल्यावर ती फटकन म्हणते,"अरे,कुत्र्याच्या जन्माला आला आहेस तर कुत्र्यासारखा वाग!असा काय तू माणसासारखा वागत आहेस?आणि हे काय?अजून भाद्रपदाला बराच अवकाश आहे!!"
वरील मुलगी, म्हातारा आणि मुलगा या गोष्टी दिसायला जरी तीन असल्या तरी त्यात तात्पर्य मात्र एकच आहे,"माणूस कधीही,कुठेही आणि कसल्याही परिस्थितीत सुखी नसतो!"
मी व्यसनमुक्त [सध्या] आहे तर नाटक,सिनेमा,चांगली पुस्तके,पाहू,वाचू शकत नाही.पण हे सर्व बाहेर होते त्यावेळी मी व्यसनात बुडालेला होतो.त्यामुळे त्याचा आनंद घेऊ शकत नव्हतो.कमीत कमी या छोट्या छोट्या आनंदासाठीतरी व्यसनमुक्त राहावे असे आता वाटू लागले आहे.मी स्वतःला पुन्हा उजाळा देण्यासाठी गोष्ट संक्षिप्त रूपात लिहिली कारण त्याने मलाही इतर बरेच काही वाचलेले आठवू शकेल.आठवते व सुचते,पण ऐनवेळी मात्र थोड्या वेळात सारेच शब्दाबरहुकुम लिहिणे जमत नाही त्याचा सराव व्हावा यासाठी हा क्वाईट टाईम चा तास चांगला आहे.धन्यवाद!
नमस्कार,
छान!तुम्ही उत्तम कथा लिहिली आहे.तुम्ही इथे आल्यावर या गोष्टीचा प्रत्यय आला आणि त्यातील अर्थ तुम्हाला समजला खूप छान वाटले.
तुम्ही कृपात आलात,व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला याबद्दल तुमचे कृपात स्वागत आहे.
कृपाचा प्रोग्राम समजून घ्या.पुढील सर्व कालावधीत आपण भेटूया-बोलूया.
संगीता जोशी
मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....