Monday, 11 January 2010

22-07-2009

२२-०७-२००९
हे एक बर आहे कि येथे विचार करण्यासाठी थोडा वेळ दिला जातो.नाहीतर मी उगाच आपले वर्तमानपत्रातल्या एखाद्या विषयावर मत वगैरे मांडले असते.नंतर विचार केला कि समाजाचा विचार करण्यासाठी मोठेमोठे लोक आहेत,आपण [मी स्वतःला अहोजाहो करतो.] स्वतःच एक ज्वलंत समस्या आहोत.प्रथम आपल्या संदर्भातच लिहू.
बारा,पंधरा वर्षाखाली मी महाराष्ट्राचे शेक्सपियर,राम गणेश गडकरी यांचे 'एकच प्याला' वाचले होते.त्याची थोडी आठवण झाली.जर त्याकाळी 'कृपा' किंवा यासारख्या व्यसनमुक्ती संस्था असत्या तर? राम गणेश गडकरींची हि अजरामर शोकांतिका एक सुखद शेवटात बदलली असती.अर्थात,गडकरी यांची क्षमा मागून कांही विचार मनात आले ते लिहित आहे.
'तळीराम' हा सर्वकालीन,सर्वसामाजिक असा अस्सल दारुडा आहे.त्याचे प्रतिबिंब इथल्या सर्वांतच थोड्याफार प्रमाणात दिसते.'आर्य मदिरा मंडळ' स्थापन करण्यापर्यंत आम्ही मजल मारू शकलो नाही,आणि 'सुधाकरांची' तर अजिबातच कमी नाही.पण येथेआज एक मोठी गोची आहे.....
'कशी त्यजू त्या पदाला' म्हणणारी सिंधू मात्र नाही.कारण आर्थिक स्वातंत्र्य,शिक्षण यामुळे आजची 'सिंधू' स्वावलंबी झाली आहे.ती आज 'कशी त्यजू त्या पदाला' म्हणण्याऐवजी सुधाकरच्या पार्श्वभागावर लत्ताप्रहार करून हाकलून देऊ शकते.ती स्वयंपूर्ण आहे.म्हणून जर आजचा सुधाकर वाहवत गेला तर मोठेमोठे भाषण देऊन हित सांगणाऱ्या 'रामलालांपेक्षा' किंवा त्यांच्याकडून,या सुधाकराला व्यसनमुक्ती संस्थेचा [अर्थात 'कृपा'] मार्ग दाखवनेच हितकारी आहे.
'एकच प्याला' वाचून,बघून समाजात कधी सुधाकराने बोध घेतल्याचे ऐकिवात नाही.मात्र तळीरामांपासून प्रेरणा मात्र आमच्या पिढीपर्यंत न घेताही आपोआप आली.
नाटकाच्या संदर्भात या शोकांतिकेला,शोकात्म्तेला तोड नाही.पण आजच्या संदर्भात जिथे 'कृपा' सारख्या व अजून कितीतरी संस्था समाजात आहेत तिथे या आधुनिक सुधाकराना[आणि नाठाळ तळीरामानाही ] समाजात त्यांचे स्थान प्राप्त करणे अवघड नाही.
यामुळे सर्व मद्यप्यांना वेळीच माझ्यासारखे व्यसनमुक्ती केंद्र लाभावे.म्हणून मी प्रथम स्वतःसाठी व नंतर इतरांसाठी प्रार्थना करतो.

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....