Friday 15 January 2010

07-09-2009

०७-०९-२००९
आज इनपुट मध्ये नातेसंबंध च्या बाबतीत पाहत असताना शेवट संवाद व स्वतःला काय हवे याकडे झाला.जो आणि हॅरी यांची विंडो मधील जी पहिली,ओपन विंडो आहे,आय नो अदर्स नो ,याविषयी मॅडमनी सांगितले कि,आउटपुटला त्यांनी एका कागदावर स्वतःविषयी इतरांना काय वाटते यासाठी एक एक आवडणारी व एकेक न आवडणारी गोष्ट लिहिण्यास सांगितले होते.एकूण १९ प्रतिक्रिया होत्या,जे चार-पाच नवीन आले असतील त्यांनी कदाचित कांही लिहिले नसेल पण एकंदर मी हसतमुख पण आळशी आहे असे सर्वसाधारण मत आहे.
करकरे मॅडमनी लिहिलेले मी अक्षरावरून ओळखले.शांत,उत्सुक पण न आवडणारी म्हणजे स्वतःमध्ये खोलवर कांही गोष्टी मी दडवून ठेवतो.
एकंदरीत हे सर्व मलाही माहिती आहे,इतरानाही माहिती आहे.पण सद्यस्थितीत मला हिडन सेल्फ 'आय नो अदर्स डिड नॉट नो'बद्दल विचार करावा लागेल.कारण असा विचार मी कधी केला नव्हता.
बाकी पब्लिक विन्डोबद्दल सध्या बोलणे योग्य नाही तसेच पुन्हा ब्लाक विन्डोचे आहे.
माझा आधी चुकीचा विचार होता कि,'मी कोण आहे,माझे मला माहीत आहे,त्याचे प्रदर्शन करण्याची गरज नाही.पण प्रदर्शन हा शब्द चुकीचा ठरेल. प्रदर्शन न म्हणता मी जसा आहे तसा 'व्यक्त' होणे अपेक्षित असते.ते माझ्याकडून होत नाही.मग मी उगीचच विशेषणे लावत बसतो.हि चूक मला आज कळली.
वेळ जाईल तसे तसे बर्याच गोष्टी उलगडत जातील असे वाटत आहे,त्यामुळे विषय समजल्याशिवाय मी लिहिणार नाही.शिवाय काल भाऊ भेटावयास आला होता त्यानेदेखील कांही भलते सलते विचार करत जाऊ नकोस असे सांगितले.शेवटी हे सर्व माझ्या हितासाठीच आहे त्यामुळे शांतपणे आलेला दिवस घालवावा असे मला त्याने सांगितले.
इथे 'कृपा' मध्ये आखीव दिनक्रम असल्याने बोअर वगैरे होण्याचा प्रश्नच नाही!
नमस्कार,
आपण कितीही स्वतःची तपासणी केली तरी असं लक्षात येतं कि,व्यसनाचा विचार केला असता या सगळ्या गोष्टी माहित असूनदेखील आपण यासंदर्भात कांहीच तयारी का करत नाही?
अजूनदेखील मला कळले नाही कि,तुम्ही एकट बसून,कांहीच न करता,कृतीशुन्यपणे बसून काय करणार आहात?
व्यसनाचा विचार कशातून येतो? तूमच्या कोणत्या अशा भावना आहेत,किंवा अशा कोणत्या घटना आहेत ज्या तुम्हाला अजून कुणाला सांगाव्याशा वाटत नाही?
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....