Friday 15 January 2010

11-09-2009

११-०९-२००९
आज addiction आणि recovery विषयी इनपुट मध्ये जो ग्राफ दाखवला त्यात माझ्याबाबत रॉकबॉटम ज्याला म्हणू शकू तो मी खऱ्या अर्थाने १० वर्षापुर्वीच अनुभवला होता,पण नंतर कित्येकदा रॉकबॉटम अनुभवला,याबद्दल विचारले असता मल्टीपल रॉकबॉटम असू शकतात.याचाच अर्थ मी यापूर्वीच 'मी मद्यशक्ती पुढे हतबल आहे' हे स्वीकारलेले नव्हते असाच होऊ शकेल असे वाटते.
कारण हा कांही [रॉकबॉटम] रबरी चेंडू नाही,जो पुन्हापुन्हा उसळी मारून वर खाली येत राहील त्यामुळे आता यु टर्न घेऊन रिकव्हरी,जी मी यापूर्वी कधी अनुभवलीच नाही किंवा प्रयत्नही केला नाही त्या दृष्टीने पावले उचलाविशी वाटतात.असो.
आज कुठल्याशा विद्यालयातील मानसशास्त्राचे विद्यार्थी व्याक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी आले होते,एकंदर ५० प्रश्न होते.अशा चाचण्या त्यांच्या अभ्यासाचा भाग असला तरी ४-५शे प्रश्न असलेले कांही पेपर डॉ.बर्हाळे माझ्याकडून घेत होते.त्यांना मी विचारले कि कशाकरता?तर त्यांनी थंडपणे सांगितले कि,दारू पिऊन पिऊन तुला स्किझोफ्रेनिया वगैरे झाला नाही ना ते बघतायत.त्याची आठवण झाली.
addiction च्या ग्राफ,अभ्यासाला २०१० मध्ये १०० वर्षे पूर्ण होतील म्हणे!मग त्यात [लक्षणात] १०० वर्षात काहीही फरक झाला नाही मग रिकव्हरीतही होणार नाही त्यादृष्टीने मी माझ्या बाजूने समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.पण महत्वाचा प्रश्न अजूनही कितीही विचार केला तरी मला उत्तर देता येत नाही कि,मला माझ्या आयुष्याकडून काय हवंय?
कारण प्रयत्न केल्यास नोकरी अजूनही मिळेल,किंवा दुसरीही मिळेल,कुटुंब तसे अजूनही माझ्यासोबतच आहे,सोब्रायटी आपण गृहीतच धरली आहे,पैसाही थोडाफार आहेच,लग्नही यथावकाश होईल पण हे सारे 'रुटीन' आहे.
याव्यतिरीक्त,'what i want '?चे उत्तर शोधणे माझ्यासाठी अवघडच आहे.का अस्वस्थ राहणेच मला आवडते,किंवा त्याचे भांडवल करून पिण्यासाठी बहाणा करता येतो कांही कळत नाही.

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....