Thursday, 14 January 2010

31-08-2009

३१-०८-२००९
मुळात करणे किंवा न करणे के कांही मी ठरवले नव्हते पण मी 'मुक्तांगण' मधून डिस्चार्ज झाल्यानंतर नियमितपणे follow up साठी जात असे.रात्री उशिरापर्यंत टीव्ही किंवा कॉम्प्यूटरवर चित्रपट पाही,उशिरा उठे,जेवण करून एखादे पुस्तक वाचून तीन वाजता कौन्सिलिंग सेंटरला जाऊन रात्री नऊ वाजता घरी येई.
महिनाभर हा दिनक्रम सुरु होता.याआधी उपचारासाठी असे मिळून मी जवळपास चार ते पाच महिने भावाजवळ होतो.
पण एके दिवशी आमच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या बाईंबरोबर आमच्या सोबतच राहणाऱ्या भावाच्या मित्राचा संवाद ऐकला,कि अरे,हेमंतच्या भावाला तर नोकरी होती,ती सोडून आता उगीच बसला आहे,उद्या हेमंतचे लग्न झाल्यावर काय?त्यावेळी मी ऐकून न ऐकल्यासारखे केले,पण मनात अढी निर्माण झाली कि,माझ्याच घरात हजार-पाचशे रुपयावर काम करणाऱ्या बाईने माझी चिंता वहावी?
आणि दुसरा मुलगा जो कधी वडिलांना घरी आंघोळीचे पाणी देखील काढून देत नाही त्याने का माझी फिकीर करावी?
याला तुम्ही मानसशास्त्रीय भाषेत 'uncomfort anxiety 'म्हणा किंवा इगो एण्झायटी म्हणा,पण मनात विचार आला,खरे तर मला काय कमी आहे म्हणून मी काळजी करू?
दुसरी गोष्ट मी कधीही कामाचा वगैरे विचार केला नव्हता आणि माझ्यामते माझ्या घरच्यांनी मला कधी काम कर असे सांगितले नाही.पण विनाकारण केवळ लोकलाजेस्तव काहीही काम करण्यापेक्षा वडिलोपार्जित संपत्ती विकणे मला केंव्हाही सोयीस्कर वाटले.
त्यातही खरेतर दोन वाटे व्हायचे,पण पाच वाटेही मी स्वीकारले.कारण दारू सोडली तर माझा वैयक्तिक असा खर्च नाहीच,त्यामुळे माझ्यामुळे कुणाला त्रास नको हि माझी आता भूमिका आहे.त्यात काम करावे अथवा न करावे,ते जमेल अथवा नाही हा मुद्दा गौण आहे.
त्यातही पुन्हा दुसरी माझी चूक म्हणजे मी कुणाच्याही बोलण्याने विचलित होऊन परत परत दारू न प्यायली पाहिजे होती.
कारण अजूनही मला समजून घेणारा माणूस म्हणजे माझ्यामते माझा भाऊच आहे.पण त्यालाही त्याचे जीवन आहे,त्याने माझ्यासाठी किती दिवस आर्थिक,मानसिक त्रास सहन करायचा?आणि का करावा?
नमस्कार,
तुम्हाला त्या दोघांच्या संवादामुळे नक्की कशाचा त्रास झाला?त्यांचा संबंध किंवा औकात नसताना त्यांनी का बोलायचे कि त्यांनी नेमका तोच मुद्दा बोलला कि ज्याला तुमची तोंड द्यायची तयारी किंवा इच्छा नव्हती.
एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता माझे असे वैयक्तिक मत आहे कि,प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची अढी तुम्ही मनात बाळगली आहे कारण नेमके त्या सगळ्याच गोष्टी एकतर तुमच्या कांहीच न करण्यापाशी येऊन थांबतात किंवा व्यसनापाशी.त्यामुळे सर्व संबंधित लोकांचा राग येतो किंवा अढी बसते.त्यामुळे आपण कठोरपणे स्वतःचेच परीक्षण करा.
संगीता जोशी मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....