९-१०-२००९
आज पुन्हा इनपुट/आउटपुट चा विषय बचावतंत्र होता.सतत आम्ही ती आमच्या व्यसनाच्या रक्षणासाठी वापरली मात्र,ती वापरत असताना त्या त्या वेळी वेळ मारून नेण्यापर्यंत मला त्यावेळी जे सुचले ते किंवा तसे तंत्र मी वापरले. याव्हा पुढे काय फायदा झाला? [फायदा झालाच नाही.]
खरेतर प्रत्येक वेळी मी बचावतंत्राचाच वापर केला आहे असे म्हणता येईल.कारण जसे व्यसन हा स्वभाव दोषांचाच एक घटक आहे असे मला इथे कळले.त्यावरून मी माझ्या अकार्यक्षमता, न्यूनगंड यावर काम न करता किंवा लपवण्या करिता कदाचित दारूचा आश्रय घेत असेन.नव्हे,घेत होतो असे म्हणणे योग्य वाटते.कारण माझ्या संदर्भात कधी मी नीट विचार केला नाही.केलाच नव्हता कारण अगदी लहान वयापासूनच नशेची सवय झाल्याने मी कामधंदा, कांही उद्योग करणे के कधी गृहीतच धरले नव्हते.कधीही, कुठेही काम केले नव्हते.शैक्षणिक प्रगती तर नव्हतीच. एका दिवशाच्या अभ्यासात ५०% मार्क्स पडतात.ते डिग्रीसाठी पुरेसे असतात.मी कधी कॉलेज वगैरे न करता पूर्ण पुस्तक एकदा वाचणे आणि जाताजाता एकदा एखादे गाईड चाळले कि ५०% मार्क्स पडतात हे मला माहित होते. म्हणून फक्त डिग्री मिळवणे हेच ध्येय ठेवले. त्यासाठी कांही विशेष करणे लागते असे वाटले नाही.
दुर्दैवाने वडील वारल्यानंतर ५ वर्षांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली त्यामुळे ती गेली काय नि राहिली काय. खरेतर आज मला विस्तार अधिकारी हिपोस्ट मिळाली असती आजपर्यंत पण दारूमुळे मी गेलोच नाही.त्याचे कांही वाटतही नाही कारण त्यात माझे कांहीच कर्तुत्व नव्हते.
बाहेरच्या जगात मला जाणीव आहे कि,साधारण नोकरीसाठी कायकाय करावे लागते.पण सहज मिळालेली नोकरी मी खरेतर घरच्यांवर विसंबून राहिल्याने न जाण्याचा निर्णय घेतला.त्याचा आज दु:ख,पश्चाताप वाटत आहे.कारण त्यावेळी मी पर्याय शोधण्याच्या मनस्थितीत नव्हतो.त्यातच शारीरिक अवस्था बिघडल्याने शांत राहणेच योग्य वाटले.पण हेच शांत राहणे रीलॅप्स चे कारण घडले. तेंव्हा मला एकतर स्वतः पुरते पर्याय तयार करणे भाग आहे.कारण पूर्वानुभव जरी रीलॅप्स चे असले तरी निदान पुरती माहिती काढण्यासाठी तरी मी उस्मानाबाद ला परत जाऊ इच्छितो.एकदा नोकरीचा सोक्षमोक्ष लावला कि,मग पुढचे निर्णय सुकर होतील.
नमस्कार,
मी वैशाली आज तुम्हाला उत्तर लिहित आहे.सॉरी,कारण संगीता मॅडम नाहीत त्यामुळे जरा असं विस्कळीत होत आहे.पण तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे.
तुम्ही लिहिले आहे कि तुम्ही डिफेन्स मेकॅनिझम वापरत आला आहात. आता या गोष्टीकडे असं बघा कि,तुम्हाला आता ह्याचा अवेअरनेस आलाय.जाणीव झालीय.तर भविष्यात ते करण्याचे टाळा.एक लक्षात घ्या कि,जेंव्हा आपण बऱ्यापैकी योग्य वागत असतो,प्रामाणिकपणे जगात असतो तेंव्हा हे बचाव कमी वापरावे लागतात.
* actual सेल्फ व प्रोजोक्टेड सेल्फ मध्ये जितकं अंतर असतं तितकं अवघड जातं.तुम्हाला हवं तर आपण या विषयावर बोलू.
नोकरीविषयी म्हणाल तर ते तुम्ही तुमच्या कौन्सिलरशी किंवा करकरे मॅडमशी बोला.
वैशाली जोशी मॅडम
No comments:
Post a Comment