Wednesday, 20 January 2010

14-10-2009

१४-१०-२००९
आज मोहित सरांनी 4th स्टेपविषयी छान इनपुट घेतले.मी 4th स्टेप साधारणत: जी लिहिली त्यात त्यामुळे सुसूत्रता आणता येईल.
ए.ए.च्या पुस्तकांत आणि एकंदर आजच्या इनपुट आणि आउटपूट मध्ये झालेल्या चर्चेतून माझ्यात जे बेसिक स्वभावदोष दिसले,त्यात भीती हा पुन्हा एकदा जाणवला.असुरक्षितता,अवलंबित्व याबरोबरच भीती कारण ती कशी आली किंवा एकंदर 4th स्टेप चा पायाच म्हणू शकू.अशीच एक घटना आहे.मला जशी कळली तशी..
प्रथम qt मध्ये सांगितल्याप्रमाणे मला महिती आहे कि,माझ्यात नेतृत्वगुण नाहीत त्यामुळे दुय्यम राहणे मी पसंत करतो त्यामुळे आमच्या छोट्या मंडळात देखील उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव अशी पडे मी घेत असे.
एके नवरात्रीत मी आणि माझ्या अध्यक्ष असलेल्या मित्राशी कांही कारणावरून 'बार' मध्ये भांडणे झाली.भांडण मुख्यतः पैशावरूनच होते.
मारामारी, सोडवासोडवी झाली, पण माझ्या बाजूने कोणी जास्त उभे राहिले नाही.हा मला माझा प्रचंड अपमान वाटला. खरेतर असे तणावाचे प्रसंग अनेकदा येत भांडण घडून आणल्याचा माझा संशय असल्याने मी संबंध तोडले.मी एकटा एकटा राहू लागलो.त्याकाळीच २/३ महिन्यात माझे बाहेरच्या मित्रात राहणे,दारू पिणे वाढले.एकदा हॉस्पिटयाझेशन झाले.त्यानंतर 4th स्टेप मध्ये लिहिलेले प्रकार, जसे घरी आईला मारहाण, शिवीगाळ वगैरे वाढले.
मी जसा जसा नाश जास्त करू लागलो तसे घरीच राहू लागलो.क्रिकेट वगैरे सोडले.
इथपर्यंत ठीक आहे पण मूळ आता मला कळते कि, डिपेन्डन्सी किंवा अवलंबित्व आणि ते दूर जाताच किंवा मला दुखावताच मला मी जास्त त्रास करून घेतो.त्यातून असुरक्षिततेची भावना, त्यातून न्यूनगंड, त्यातून अहंकार अशी शृंखला तर निर्माण होत नाही ना?
मुळात मी सर्वस्वी अवलंबून तरी राहायला लागतो किंवा प्रभुत्व तरी गाजवू पाहतो.हे ए.ए. तही सांगितले आहे, हे एकदम सत्य आहे.त्यांनी माझ्या मागण्या करायला नकार दिला माझी खुन्नस वाढते.
सद्यस्थितीत जरी त्या भावना तीव्र नसल्या तरी माझ्यात एकंदर काय दोष आहेत ते पाहण्यासाठी 4th स्टेप करणे आवश्यक वाटते.जे मी लिहिले त्यातून मला माझ्या समस्येच्या मूळाशी पाहता येऊ लागले आहे.किंवा तसे वाटते.कारण इतरवेळी मी स्वतः कडे न पाहता ब्लेमिंग द्वारे माझी बाजू मांडत होतो.आता ते तरी बंद झाले आहे .असो.

जाता जाता.. कुणी तरी आज म्हणाले कि, कॉंग्रेसचे सरकार परत येणार! त्यावर खलील जिब्रानची एक गोष्ट आठवली...
एक कोल्हा असतो. तो एका झाडीत अडकतो. बरेच प्रयत्न करूनही त्याला सुटका घेता येत नाही.वेळ संध्याकाळची असते.तो तसाच थांबतो.त्याच्या अंगावर रक्त पिणाऱ्या जळवा-पिसू बसतात.ते एक खार बघते.ती त्याला म्हणते कि, भाऊ तुझी एवढी गोंडेदार शेपटी आहे मदत येईपर्यंत तू तसाच थांबला आहेस हे खरे..पण खरेतर या शेपटीने तू या पिसवा का उडवत नाहीस?
त्यावर कोल्हा उत्तरतो, अगं, यांनी माझे आता पोटभर रक्त पिले आहे त्या आता पुन्हा जास्त पिणार नाहीत.त्यांना जर हाकलले तर नवीन येऊन पुन्हा नव्या दमाने रक्त पितील.त्यमुळे आहे तेच बरे!
तसे आपल्याला मतदानाच्या हक्कची गोंडेदार शेपटी आहे पण सध्या आपण कोल्हयासारखे संक्रमण काळात अडकले आहोत.केंव्हातरी पहाट होईल,कुठलातरी इझम,पक्ष,विचार आपल्याला सोडवील या आशेवर आपण आहोत पण सद्यस्थितीत खंबीर असे विरोधी नाहीत,जे आहेत त्यांच्या आणि ह्यांच्या वृत्तीत फारसा बदल नाही.शोषण शेवटी आहेच तेंव्हा
काँग्रेस आलेतर त्यात कांही नवल नाही!
नमस्कार,
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 4th स्टेप करणं हि खरोखरीच आवश्यक गोष्ट आहे.त्याबद्दल एक सांगू इच्छिते, ते म्हणजे आपण जेंव्हा सगळ्या चुका, आकस अन्याय [स्वतःवर वा इतरांवर आपण केलेला] यांचा पाढा वाचतो.त्यामागे हा पण एक हेतू आहे कि, आठवून, लिहून त्यानंतर त्या भावना मनातून काढून टाकणे.
ते जरी नाही जमले तरी त्यांची तीव्रता कमी करणे.अवघड असले तरी आपले ध्येय हेच ठेवायचे कारण अशा भावना मनात ठेऊन अआपला फायदातर नाहीच पण तोटाच नक्की होतो.
अजून एक गोष्ट महत्वाची अशी कि, स्वतःशी comfortable आपण तेंव्हाच राहू शकतो जेंव्हा आपण खरं, प्रामाणिक, योग्य वागत असतो.त्यामुळे प्रयत्न असा ठेवणे कि, आयुष्य सरळ, सोपं घालवणे.
आपण
बोलूया.
वैशाली जोशी मॅडम










No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....