
पर्यावरण, जागतिक तापमानवृद्धी (ग्लोबल वॉर्मिंग) आणि वृक्षसंवर्धन याविषयी आपण अनेकदा बोलतो, विद्वानांचे परिसंवाद ऐकतो. समाजसेवी संस्था, मंडळे, कुठेतरी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतात, त्याचे पुढे काय होते, ते वृक्ष कोण संगोपन करतो हे अलाहिदा! पण राहून राहून प्रश्न असा उभा राहतो की, जी जंगले आहेत, त्यांचे काय? त्यांची अशी बेकायदेशीर, हजारोंच्या घरात तोड होते, याला पायबंद घातला तर निश्चितच पर्यावरण, जागतिक तापमानवृद्धी (ग्लोबल वॉर्मिंग)इत्यादी इत्यादी प्रश्नांचा मुकाबला करता येईल. नको तिकडे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे वांझोटे मैथुन करण्यापेक्षा आहे त्या आणि आपणच नामशेष करत चाललेल्या जंगलांविषयी आपण सजग राहिले पाहिजे पण दुर्दैवाने तसे घडत नसल्याचे दिसते. याविषयी अक्षरश: अंगावर काटा उभे राहील असे वास्तव बाबा(अनिल अवचट) यांनी दहा ११ वर्षापूर्वीच प्रत्यक्ष फिरून माहिती गोळा करून लिहिले आहे ते 'प्रश्न आणि प्रश्न' या लेखसंग्रहात पुस्तकरूपात आहे, मात्र तरीही इथे द्यावे वाटते. तो लेख खाली दिला आहे. त्यामुळे काहीनाही तरी निदान थोडी जंगलाविषयी जागरूकता वाढेल!
प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment