
क्रुसाच्या कन्वटीला आपण आपला समागम उरकला
किंवा पखाली भरभरून मुसळधार घाम निथळला
जीव धरून जळणा-या कॅन्डल्स पायावरच विझल्या
हां हां म्हंता गावभर झाल्या
आपल्या माथ्यावरच्या काळ्याकुट्ट बेवारशी बेटावर
पालथ्या पडलेल्या चंद्रबिंदीचे श्वास नवोदित
वेश्येसारखे जागोजाग दुखावलेले
शेजारी होमगार्डचे रिकामे मैदान दुष्मनदावा साधलेले
कोसच्या कोस चाळवलेलं म्यांव म्यांव रातमांजर
रस्तोरस्ती आपण प्रशान्त रातडांबर
नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment