Sunday, 4 April 2010
आमच्या आळीतून जाताना....
हे महाग्यानी लोक
हिंडताहेत मशाली पेटवून
गल्लीबोळांतून, आळीआळींतून
जेथे उंदीर उपाशी मरतात--
त्या आमच्या खोपटांतील
काळोख, म्हणे त्यांना कळतो
पाणचट गवशीसारखे हेही एक थेर!
ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार कळत नाही
त्यांनी पेटलेल्या माण्सांना
छप्पन-टिकली बहुचकपणा
अजूनही दाखवावा!
अरे धुर्तांनो, ज्यांना तुमची नसननस कळलीय
त्यांच्याशी तरी इमान राखा
आणि ज्यांना उजेड दिसत नसेल
त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा;
आमची ना नाही
मात्र एक :
आमच्या आळीतून जाताना
त्या विझवूनच पुढे जा
आज आम्हाला या खोपटा-खोपटांतून
पूर्ण सूर्य दिसतोय!
नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
हंस-दमयंती
Dhingana
an alcoholic
- Pravin Kulkarni
- Pune, Maharashtra, India
- Hi.. I am Pravin and I am an alcoholic....
No comments:
Post a Comment