
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
हवेत ऊब भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले
उन्हे जळात हलती तिथे बसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहूनी स्वतः अबोध गूज सांगते
तृणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
तुला मला न ठाउके पुन्हा कधी कुठे असू?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
उरी भरून राहिले तुला दिसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहूनी स्वतः अबोध गूज सांगते
तृणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे!
गीत:शांता शेळके
संगीत,गायक:यशवंत देव
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment