Thursday, 1 April 2010

बस्तरचे अरण्यरुदन : अनिल अवचट : २


भोपाळला मी पहिल्यांदाच येत होतो. सुरुवातीला बकाल वाटले; पण हळूहळू आवडत गेले. आणि पुढच्या खेपेला आलो तर त्याच्या प्रेमातच पडलो. शहरात बडा तलाव, छोटा तालाब असे आणखी काही सुंदर विस्तृत तलाव. मशीदीवर आलेले नक्षीदार मनोरे, चार्ल्स कोरियाने डिझाईन केलेल्या भारत भवनापासून विधानभवनापर्यंत अनेक आधुनिक, जराही उथळ स्वरूप नसलेल्या इमारती; आणि मुख्य म्हणजे तिथले हरहुन्नरी लोक. एका एस.टी.डी.बूथमध्ये शिरलो. एक छोटा बोळ आणि पुढे छोटी खोली, एवढीच जागा. त्या माणसाने सर्व भिंती, छत, पंख्याची पाती, एवढेच काय, लाइटची बटणेही माधुरी दीक्षितच्या मथ्य पोस्टर्सनी किंवा वेगवेगळ्या आकाराच्या तिच्या अनेक फोटोंनी भरून काढली आहेत. फक्त जमिनीवर फोटो नाहीत. मी माधुरीच्या प्रांतातला, म्हणून त्याने मला चहाही पाजला.
त्याने भोपाळच्या त-हेवाईक लोकांवरचे छोटे पुस्तकही दिले. त्यात एका खूप मोठ्ठे नखे वाढलेल्या माणसाचा फोटो आहे आणि तो रोज अनेकांना दाखवतो. म्हणून त्याने त्यावर जाहिराती घेण्यास प्रारंभ केला आहे. तिथल्या आटोरिक्षा खूप सुशोभित केलेल्या. आतून वर आरसेमहालच असलेल्या. रिक्षेवाला म्हणाला, "भोपाल जैसी रिक्षा पुरे भारतमे नाही मिलेगी." पानांची दुकाने अगदी ऐश्वर्याची, ऐटीची. काही पानवाले सिगारेट, तंबाकू-पुड्या विकत नाहीत. तिथे 'पान और खीर भांडार' अशा पाट्या बघून त्याविषयी विचारले. एक जण म्हणाला, "इथं जेवण झालं कि चालत चालत लोक येतात, खीर खातात. मग वर पान खातात. खीर खाल्यावर पानाची मजा औरच, म्हणून." कसेटच्या दुकानात गेलो. त्याची ऐट अशी, की कुठल्याही भाषेतल्या गाण्याची कुठलीही सेट मिळेल. मी गुलाम अली-आशा ची एक सेट मागितली. ती नव्हती. शेजारीच गोडाऊन आहे. तिथे बघायला गेला. थोडा वेळ लागला, तसे मी म्हटले, "जाऊ द्या हो. मला काही एवढी गरज नव्हती." तो जवळपास आडवाच पडला. "तुम्ही असे जाऊ नका. माझी इज्जत जाईल." दोन-तीन मिनिटातच हातातसेट घेऊन हर्षवायू झाल्यासारखा तो पोरगा आल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. महात्मा गांधीच्या नावाचे एक हॉटेल आहे. तिथे चिकन, मटन, फिश उत्तम मिळते!
अशा शौकिनांच्या शहरात नायडूसारख्या बस्तरच्या 'नेक्सस' किंवा माफियाविरोधी उभ्या राहणा-या माणसाला मला भेटायचे होते. हा माणूस दिसत कसा असेल? बोलायला कसा असेल, असा विचार मी करत होतो. विधानभवनाच्या परिसरात कुठल्यातरी विभागाचे ते संचालक होते. त्यांना ऑफिसमध्ये भेटलो. तरुण, तडफदार, आय. ए. एस. अधिका-याच्या प्रतिमेत ते अजिबातच बसणारे नव्हते. तिशी-पस्तिशितले, काळे, थोडेसे स्थूल, थंडी असल्याने ब्राऊन रंगाचा स्वेटर घातलेले ते गृहस्थ होते. त्यांच्या चेह-यावर चटपटीतपणा, तल्लखपणा अजिबातच नव्हता. गोल चेह-याचा फारसे न बोलणारा माणूस.
त्यांच्या सहवासात मी दोन दिवस राहिलो. त्यांच्या घरी जेवलो. त्यांच्या छोट्या मुलीबरोबर भरपूर खेळलो. घरी, ऑफिसमध्ये, परत घरी भरपूर बोलणे झाल्यावर माझे समाधान झाले, की मी एका वेगळ्या माणसाला भेटलोय. अनेक
आय. ए. एस. अधिका-याचे वडीलही आय. ए. एस. किंवा ए.सी.आय. असतात. त्यांना लहानपणापासून माहित असते, हाताखालच्या माणसांना कसे वागवायचे, किती अंतरावर ठेवायचे. अधिकार त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भागच होऊन गेलेला असतो. नायडूंना तशी पार्श्वभूमी नव्हती. मी विचारले, "वडील कोण होते?"
ते शांतपणे म्हणाले, "पोलीस कॉन्सटेबल."
अशा शौकिनांच्या शहरात नायडूसारख्या बस्तरच्या 'नेक्सस' किंवा माफियाविरोधी उभ्या राहणा-या माणसाला मला भेटायचे होते. हा माणूस दिसत कसा असेल? बोलायला कसा असेल, असा विचार मी करत होतो. विधानभवनाच्या परिसरात कुठल्यातरी विभागाचे ते संचालक होते. त्यांना ऑफिसमध्ये भेटलो. तरुण, तडफदार, आय. ए. एस. अधिका-याच्या प्रतिमेत ते अजिबातच बसणारे नव्हते. तिशी-पस्तिशितले, काळे, थोडेसे स्थूल, थंडी असल्याने ब्राऊन रंगाचा स्वेटर घातलेले ते गृहस्थ होते. त्यांच्या चेह-यावर चटपटीतपणा, तल्लखपणा अजिबातच नव्हता. गोल चेह-याचा फारसे न बोलणारा माणूस.
त्यांच्या सहवासात मी दोन दिवस राहिलो. त्यांच्या घरी जेवलो. त्यांच्या छोट्या मुलीबरोबर भरपूर खेळलो. घरी, ऑफिसमध्ये, परत घरी भरपूर बोलणे झाल्यावर माझे समाधान झाले, की मी एका वेगळ्या माणसाला भेटलोय. अनेक
आय. ए. एस. अधिका-याचे वडीलही आय. ए. एस. किंवा ए.सी.आय. असतात. त्यांना लहानपणापासून माहित असते, हाताखालच्या माणसांना कसे वागवायचे, किती अंतरावर ठेवायचे. अधिकार त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भागच होऊन गेलेला असतो. नायडूंना तशी पार्श्वभूमी नव्हती. मी विचारले, "वडील कोण होते?"
ते शांतपणे म्हणाले, "पोलीस कॉन्सटेबल."
मी उडालोच. पुढेही तितक्याच शांतपणे म्हणाले, "मीही पोलीस कॉनस्टेबलच होतो."
नायडूंचे वडील खूप अकाली गेले. नायडूंनी कष्ट करून बी.ए. केले. वडिलांच्या जागी नोकरी मिळाली. टे शिकलेले, इंग्रजी चांगले, म्हणून एका डी.सी.पी.ने यांना हाताखाली क्लर्क म्हणून घेतलत ते
डी.सी.पी.त्यावेळी आय.ए.एस.ला बसत होते. अनेकदा बसून परत प्रयत्न करत होते. नायडू त्यांना रेफरन्स काढून द्यायचे. पुस्तके, नोट्स लावून ठेवायचे. एक दिवस त्यांनी 'कॉपिटीशन सक्सेस'चा अंक पहिला. त्यात त्या वेळचा आय.ए.एस.चा पेपर छापून आलेला होता. तो त्यांनी वाचला आणि मनाशी म्हणाले, 'अरे, हे सगळं आपल्याला येतंच आहे की.मग आपण का बसू नये?' तसे ते बसले आणि पासही झाले. डी.सी.पी.अजूनही पास झालेले नाहीत. तोंडी परीक्षेसाठी सराव व्हावा म्हणून चेन्नईला रजा घेऊन गेले आणि तिथला एक क्लास लावला. दुस-या चान्सला ते पासही झाले. त्यांची आतापर्यंत विलासपूर, राजगढ इत्यादी ठिकाणी नोकरी झाली होती. त्या त्या ठिकाणी गरिबांसाठी काय करता येईल, याचा त्यांना ध्यास असे. साहजिकच त्या भागातल्या लोकांमध्ये त्यांचे नाव पसरे; पण राजकारण्यांना ते अडचणीचे होऊ लागत. बस्तरचे पोस्टिंग कुणी मागत नसे. मध्य प्रदेशात ते काळे पाणीच जसे. तिथे त्यांना टाकले. त्यातून हे सगळे निष्पन्न झाले.
त्यांच्याभोवतीच्या आंय.पी.एस. सर्कलमधेही ते एक थट्टेचा, मत्सराचा विषय झाले. वरीष्ठांविरुद्ध आवाज उठवणारा म्हणून तर काही जण त्यांना व्यवस्थेचा शत्रूच समजतात.नायडू अबोल आहेत. राजकारण्यात, अधिका-यांत मिसळत नाहीत. तरी ते सतत लिहित असतात. ते आपली दु:खे, ताणताणाव बोलू शकत नाहीत; पण स्वतःसाठी छोटे छोटे लेख लिहून ठेवतात. तसे काही पाहायला मिळाले. रामायणातील बेडकाची गोष्ट सुरुवातीला आहे : 'एक बेडूक रामभक्त असतो. सतत रामाचे नाव घेत असतो. काही संकट आले की रामनाम जपल्यावर त्यातून तो सुटका करून घेऊ शकत असे. एके दिवशी समोरून साक्षात राम येताना दिसला. बेडूक आनंदाने उड्या मारत, चरणस्पर्श करायला जाऊ लागला. तोच रामाने धनुष्य खाली ठेवले. त्याखाली नेमका तो बेडूक सापडला. एरवी संकट आले की रामाचा धावा करायचा. आज ज्याचा धावा करायचा त्यानेच संकट आणलेय...अशा परिस्थितीत मी सापडलोय....' अशी सुरुवात करून त्यांच्यावर चालू असलेल्या लोकायुक्तांच्या चौकशीविषयी लिहिलंय. हा कुठेच सापडत नाही, हे पाहिल्यावर काही अदृश्य शक्तींनी त्यांना एका प्रकरणात गोवले. एका केटरिंग कॉलेजला भाड्याने जागा हवी होती. त्याचे भाडे निश्चित करायचे होते. सार्वजनिक संस्था जागा भाड्याने घेताना भाडेनिश्चीती कलेक्टरवर सोपवत असतात. इंजिनिअर लोकांनी, अधिका-यांनी ते प्रकरण यांच्याकडे मंजुरीसाठी आणले. त्यात काही गैर नव्हते. ते यांनी मंजूर केले. ती संस्था त्या जागेत हलली. त्यांचे सगळे उत्तम चालले आहे. कोणाची तक्रार नव्हती. एके दिवशी अचानक कारवाई सुरु झाली. 'भाडे हे जास्त रकमेने मंजूर का केले? त्यामागे तुमचा स्वार्थ कशावरून नाही?' असा तिचा रोख होता. प्रकरण लोकायुक्तांकडे गेले. त्यांनी नायडूंना स्पष्टीकरणाची संधी न देता ठपका ठेवला. अजून ती चौकशी चालूच आहे; पण कुठेही प्रमोशनचा प्रश्न आला, की यांच्यावर 'लोकायुक्त चौकशी चालू आहे.' म्हटले जाते आणि संधी नाकारली जाते.
नायाडो म्हणाले, "ही अशी अनेक प्रकरणं कलेक्टरपुढे येत असतात. हाताखालच्यांवर आपल्याला विसंबाव लागतंच. जर यात कुठं अवास्तव रक्कम असली, तर आपण लक्ष देतो. आणि जर खरोखरीच चूक असेल तर इन्क्वायरी व्हायला पाहिजे.
मला माझा डिफेन्स देता येईल. ज्या न्याय-व्यवस्थेकडे आपण आशेने बघतो, तिथंच असा अनुभव आला तर? माझी अवस्था त्या रामाच्या गोष्टीतल्या बेडकासारखी होते."
त्यांचे घरही साधे, बस्तरहून बदलून आल्यामुळे बस्तरला बनणारे लाकडी फर्निचर , कोप-यात टी-पॉय वर आदिवासींनी बनवलेल्या वस्तू, भिंतीवर मास्क. तेलुगुभाषिक कुटुंब. या हस-या कुटुंबावर बस्तरमध्ये केवढे दडपण आले असेल!
मी त्यांना म्हंटले, "तुमच्याविषयी असं ऐकलंय, की सध्याचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्या तुम्ही फेवरमधले आहात. अरविंद नेताम या प्रतिस्पर्ध्याचा अडसर दूर करण्यासाठी तुम्हाला बस्तरमध्ये पाठवलंय. तुम्हाला काय वाटतं?"
ते म्हणाले, "लोक असं म्हणतात, हे मीही ऐकलंय; पण माझ्या मनानं मी स्वच्छ आहे, तिथं बेकायदेशीर कृत्यांमध्ये दिग्विजयसिंग यांचा माणूस सापडला असता, तरी मी त्याला सोडला नसता. मी एक ऑनेस्टली काम करू इच्छिणारा सरकारी सेवक आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात राजगढला माझं पोस्टिंग होतं. तिथं मी साक्षरता-मोहीम, पाण्याचा प्रश्न अशा अनेक क्षेत्रात काम केलंय. त्यांनी तिथं कधी ढवळाढवळ केली नाही. बस्तरविषयी खूप ओरड वाढली होती. त्याच्यावर शुक्ला-संकत कमिटी नेमली गेली होती. वर्तमानपत्रातून सरकारवर टीका होत होती. मुख्यमंत्र्यांनी मला तिथं नेमण्यापूर्वी बोलावून सांगितलं, की हे प्रकरण निर्भयपणे हाताळा. त्यांची काहीही इंटेन्शनस असतील, त्यांच्याशी मला काही कर्तव्य नाही. मला जे योग्य, न्याय्य दिसलं ते मी केलं."
नंतर आता तिथूनही त्यांची विदिशाला कलेक्टर म्हणून बदली झाली आहे. अधूनमधून आम्ही एकमेकांना फोन करून स्नेह जागता ठेवला आहे.
नारायण सिंगांची फक्त दूर बदली झाली आहे. त्यांनी एवढे करूनही त्यांना फारसा धक्का लागलेला नाही.


प्रश्न आणि प्रश्न
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....