Sunday, 4 April 2010
वेश्येच्या धंदेवाईक प्रेरणांतून
वेश्येच्या धंदेवाईक प्रेरणांतून सांगाडलेलं जिभांचं जुळ
आतड्यातून फुटून आलंय मणिकांचन
डावे उजवे करत बसलेल्या नेपाळी पोरी जश्या
तुफानात मोडतोड झालेल्या वनस्पती वाजताहेत गोलघुमट
त्यांच्या थिजलेल्या हृदयात हंबरलेला प्लास्टिकचा बुद्ध
पावसाळातल्या घरंदाज हिर्वळीत उठून दिसावा इत्का सतेज
साहेबी द्राक्षानं गहिवरलेलं आखात
गडबड्या लोळणा-या दळभद्रया भिका-यांना सुचीपर्णी गोधडी
मनगटावरल्या चमेलीगज-यात कवळ्या कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक
बैलाची शिंगं घुसडताहेत काबुली दाढीत
अटातटीच्या दळणवळणाखाली फिरला जातो सापेक्ष मुडदा
उखाडलेल्या खडीची सांधेजोड पिळीत
चिघळलेल्या लिक्विड यातनांवर खरचटत राहते दूरवर
दाभणधार चौउधळ पाठमोहरी
शिंकरतात सहानुभूती भय्येबाज दुधाचे ट्रक्स गुरुशर्टवर
प्रेतवत आंगामांड्यांची बाजारू लपेट फेकली जाते
टेलिव्हिजनवरून आपल्यात
आपण होतो गोगलगाय : शंखशिंपले आणि जास्वंदी गिधाड
नामदेव ढसाळ
संकलक:प्रवीण कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
हंस-दमयंती
Dhingana
an alcoholic
- Pravin Kulkarni
- Pune, Maharashtra, India
- Hi.. I am Pravin and I am an alcoholic....
No comments:
Post a Comment