Thursday 22 April 2010

बॉस...


बॉस खूप उशीरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत राहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा....

मी लग्नाळलेला...वाटायचं--'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत राहणं!'....

यथावकाश माझंही लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरट सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले...

आणि हळू हळू पंख सैलावत जाताना
घरट्याची हाक आता तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करीत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजूतदारपणाने
घरी न जाता काम करत राहण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते....


संदीप खरे
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....