
अंधाराने सूर्य पाहिला तेंव्हा
शब्द हुंकारले
नरकाच्या कोंडवाड्यात
किती दिवस राहायचं आम्ही?
श्वास घुसमटत!
...न...नष्टचर्येच्या गटारात
सडत होतो आम्ही अगतिक किड्यासारखे
आजपर्यंत.....
लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू
गोलपिठ्यावर नागविणारांनो--
--तुमचा -हास जवळ आलाय :
मुक्तछंदाच्या संजीवनीने
आम्ही जिवंत झालो आहोत--
--तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी!
--शब्द म्हणाले
अंधाराने सूर्य पाहिला तेंव्हा
नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment