


मित्र हो,
‘चषक माझा’ हे विडंबन काव्य ऑर्कूटवर प्रकाशित झाल्यानंतर त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला.
हे कम्युनिटी स्वरुपातील पुस्तक आहे. पण याला मेंबरशीप नाही. कारण तुम्ही अभिप्राय नोंदवत
राहिला असतात आणि मग कदाचित पुस्तकाचं मूळ स्वरुप पार बदलून गेलं असतं.
म्हणून मग खास तुमचे शेर, शेरे आणि ताशेरे यासाठी ‘चषक माझा फॅन क्लब’ ही वेगळी कम्युनिटी
सुरू केली आहे. इथं तुम्ही या पुस्तकावरचे अभिप्राय, तुमच्या कविता, चारोळ्या वगैरे नोंदवू शकता.. पण
अट एकच... हे सारं चषक संबंधित असावं. तुमच्या अधिकाधिक मित्रांना या चषकाचा पत्ता द्या. त्यांना
हे वाचू दे. शेवटी ‘वाचाल तर वाचाल’ हेच सत्य.
अविनाश ओगल्यांची परवा न करता मी माझ्या ब्लॉग वर चषक आणला! अर्थात न विचारता खरेतर गेले कांही दिवस मी शरीराने चषकापासून दूर आहे खरा पण मनाने नाही त्याचेच द्योतक म्हणून हा चषक!!
प्रवीण कुलकर्णी
▒
No comments:
Post a Comment