काल भावाशी बोलल्यावर माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याला मला काय अभिप्रेत होते ते मी सांगितले, देवाच्या दयेने थोडीफार विनोदबुद्धी असल्याने संवाद साधताना त्रास होत नाही! किंवा एकतर मला काय म्हणायचे त्याला समजते.
एकंदरीत अपेक्षेप्रमाणे त्याला माझ्यावर विश्वास नाही. परत जर पिलो तर मदत करणार नाही म्हणाला, मी म्हणलो, 'मी दारूला चालेंज वगैरे कधी करत नाही. पण प्रयत्न प्रामाणिकपणे करीन' कारण मी दारू सोडण्याचा [त्याच्या भाषेत] निर्णय जो काही घेतला आहे तो, कुणाला बरे वाटावे म्हणून नाही तर मला त्रास होतो म्हणून.राहिला एकत्र राहण्याचा प्रश्न तर गेले कांही वर्षे एकत्र राहिलो नाही म्हणून तसे कदाचित वाटत असावे. पुढे एक-दोन वर्षात वेगळे झालो तरी, मला आर्थिक सुरक्षा हवी. म्हणून जमिनीचा मुद्दा.तिसरी गोष्ट अशी कि सध्या तो मित्रांसोबत राहतो तिथे टीव्ही, इंटरनेट सारख्या छोट्या बाबीतून मी रागावतो हे माझे मायनस बाजू आहेत. ते सोडले तरी माझा पूर्वानुभव लक्षात घेता आईदेखील माझ्यासोबत रहायला तयार होण्याची शक्यता नाही.
मी म्हणालो, 'मी माझ्या बाबी स्पष्ट केल्या आहेत, आता [खरेतर एकदा सातवीत आणि दुसऱ्यांदा दहावीत नापास झाल्यावर मी शिक्षण सोडणार होतो, पण वडील म्हणाले वाचन वगैरे करतो तर फारतर कॉलेज ला जाऊ नको पण शिक म्हणून शिकलो!] आता थोडं अभ्यास करू!
पुढील महिन्यात मित्राचे वडील येणार आहेत, कदाचित त्यांच्यासोबत जाऊन नोकरीचे फायनल करीन कारण जरी बाह्य परिस्थिती कारणीभूत नसते, हाऊ-हाल्ट माहित असले तरी एकटा जाऊन परत तोच धोका मला पत्करायचा नाही. तसेही दारू पिता, न पिता चार माणसे आपल्याला चांगले समजतात तर मदत घ्यायला काय हरकत आहे?
सद्यस्थितीत आपल्याजवळ फारसा पैसा नाही हे मलाही माहित आहे हे त्याला मी सांगितले पण सतत दारू+दवाखाना +व्यसनमुक्ती केंद्र याचा मलाही कंटाळा आलाय. कारण दारू खरेतर आताही मला खूप आवडते पण त्रास व्हायला लागल्यावर त्याचा काही उपयोग नाही.कारण बऱ्याच गोष्टी मी करायच्या तेंव्हा केल्या नाहीत आणि करू नये ते केले म्हणून ज्याच्यातून मी खरेच आनंदी राहू शकेन असे वाटते ते मी करणार आहे, अर्थात त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता जरूर घेईन.
शेवटचा मुद्दा स्पष्ट करताना सांगितले कि, माझ्याकडून नोकरीची वगैरे काही अपेक्षा ठेऊ नका कारण मी करणार नाही. सध्या करावी वाटत नाही याचा अर्थ आयुष्यात कधीही नाही. शेवटी परिस्थिती माणसाला सर्व शिकवते, यावर त्याने संमती दर्शवली.शेवटी दारूची अजून भीती वाटते असे सांगितले, कारण उगाच विश्वास वगैरे देण्याच्या फंदात मी पडत नाही कारण मला ते सर्व खरेच हवे आहेत.
No comments:
Post a Comment