Tuesday 2 February 2010

27-11-2009

काळ सासवड मध्ये ret च्या सत्रात मी माझी समस्या सांगितली.तेंव्हा मॅडम, उमराणी सरांनी तसे का वाटते, त्याच्या मूळाशी जाणे, स्वतःला का? कसे? असे प्रश्न विचारावे शेवटी मला काय वाटते हे महत्वाचे, आनंदी कसे राहता येईल हे पाहावे..वगैरे छान सांगितले.
पण पुन्हा मुख्य मुद्दा तर,'द अदर्स' शी संबंधितच माझ्या मते तरी येतो. याबाबत पुन्हा संभ्रम, विचारात गोंधळ आहेच.कारण माझे भावाशी कांहीच बोलणे झाले नाही.सध्या ते मला त्यांच्याकडे ठेऊन घ्यायला तयार आहेत कि नाही इथपासून सारीच अनिश्चीत्ती आहे. सध्यातरी मी परावलंबीच आहे. त्यामुळे, सांजा मी नोकरीच्या संदर्भात गेलो तरी, लगेच कांही हजर होत येणार नाही, तोपर्यंत काय? वगैरे सर्व शंका आहेतच.
माझ्या मतानुसार आर्थिक स्वातंत्र्य असल्याशिवाय मी काही करेन अथवा नाही याचा निर्णय घेईन असे नाही.
दोन वर्षापूर्वी नोकरीवरील साहेब, निदान रजेचा अर्ज देऊन जा, राजीनामा देऊ नको, असे बजावत होते. सहकारीदेखील, कुणी कुणाचा नसतो, पैशाशिवाय मिथे काही नाही हे सर्व हितचिंतकाच्याच भावनेने सांगत होते.पण घरच्यांच्या भरवशावर इथे आलो हे चुकलो असे वाटते. याचा निश्चितच पश्चाताप वाटतो आहे.यापुढे हि चूक करणार नाही त्यामुळे वाटेल त्या किमतीवर आवडो अथवा न आवडो, मला जाणे भाग आहे. कारण कुणी कुणाला फुकट पोसत नसतो, मी लाख कुणी काही म्हणो पण मला मात्र चांगले अनुभव आलेले नाहीत.
राहिली बाब वडिलोपार्जित जमिनीची वगैरे तर, तो केवळ आपले अस्तित्व दाखवण्याचा एक प्रयत्न होता, कारण, वडिलांचे पैसे होते तोवर मी काही बोललो नाही कारण ती आपकमाई होती, आता रोलनुसार वागा म्हणजे काय? तर मी कमावत असलेली तीन वर्षे सोडली तर वडील वारल्यानंतर घरात माझे अस्तित्वच कुठे होते? कधी काकावगैरे तर कधी कुठे, पैसा नाही म्हणूनच हे सर्व ना?
त्या अस्थिरतेत मला स्वताचे वर्तुळ देखील निर्माण करता आले नाही, त्यांना त्यांच्या वर्तुळात करमत असेल तर मलाही माझ्याभोवती एक बरे/वाईट वर्तुळ बांधावे लागेल.कारण मला आता काम करो न करो पण स्थिरता हवी आहे. अनिश्चितता वेगळी, स्थिरता वेगळी. ती कशीही कोणत्याही किमतीवर मिळाली तरी चालेल.


दुसरा मुद्दा अजून शिक्षणाचा पुढील काही शिकण्याचा तर हे साध्यही नाही आणि साधनही नाही. मी आतापर्यंत थोडेफार फक्त वाचन केले, त्यात कुठेतरी शिस्त असावी, पूर्वी कधी अभ्यास केला नाही, एक दिवसाच्या अभ्यासावर पास होत आलो, मग आता का नाही? तेही दारू पिऊनच हे सर्व केले आता तर तेही नाही! फरक इतकाच! नशेत आतापर्यंत जे जे केले नाही, करायचे राहिले, ते करणे कारण नुसत्या प्राथमिक शिक्षणातही सहज दहा वर्षे जातात! शिक्षणाला वयाची थोडीच अट असते! कारण नोकरी करूनही , न करूनही रिकामा वेळ त्यात घालवावा असे वाटते, कारण मुख्य प्रश्न रिकाम्या वेळेचाच आहे.
त्यासाठी मला उस्मानाबादला जाऊन तेथील माहितीत घेऊन पुढे काय ते ठरवावे लागेल, पण सध्या तरी भाऊ आल्याशिवाय ते शक्य नाही.




No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....