Wednesday, 17 February 2010

'टूबी ऑर नॉट टूबी' आणि असंच काहीतरी...


आज चार वाजता 'कृपा' मध्ये रीलॅप्स प्रिवेन्शन मिटिंग मध्ये बरेच काही मुद्दे नव्याने उजळले गेले.पण माझ्यामते हा 'हॅम्लेट' मध्ये पडणारा प्रश्न आहे.थोडाफार तसा असतो! पुढे काय होणार याची स्पष्ट कल्पना असते, हि फक्त स्लीप आहे, हा काही रीलॅप्स नाही, असे कांही समर्थनेही असतात.निदान माझ्याबाबत तरी असतात! त्यासाठी माझ्यामते फक्त जागरुकता महत्वाची वाटते.त्यासाठी जसे मॅडम, सर सांगतात तसे एकतर आपण स्वतःशी खुश नसतो हे एक आणि आपण वर्तमानात नसतो हे एक, तर कितीही केले तरी मनात दुसरे किंवा प्रसंगाला धरून पण स्वतःशी निगडीत मानून विचार येतातच, बाकी सर्व विषय जरी आपल्या [म्हणजे माझ्या] डोक्याबाहेर असले तरी नेमके पाच मिनिटे तरी आपण एखाद्या प्रसंगाला तठस्थपणे पाहू शकलो का? किंवा शांतपणे उभे राहू शकलो का? हे पाहण्याचा प्रयत्न केला.[म्हणजे पाहत वगैरे असताना डोक्यात असा अजिबात विचार नव्हता पण रात्री [म्हणजे पहाटे] झोपताना विचार आला. तर उत्तर 'काहीतरी असेच' असे आले.म्हणून ते पाच मिनिटे थोडी आठवली!
'कृपा' मधून साधारण साडेसहा वाजता बाहेर आल्यावर थोडा नास्ता करून थेट शनिवारवाडा गाठला.[तेवढीच फुकट काही करमणूक आहे का? पाहण्यासाठी] तर तिथे 'कसबा श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा सुरु होणार होती, सुरु व्हायला बऱ्यापैकी वेळ होता, जाऊद्या,थोडे फिरून येऊ असा विचार केला पण तेवढ्यात पिंकी [लहान बहिण] गावाहून येणार, ती आली असेल घरी जाऊ म्हटले.
मधल्या मार्गे पूल ओलांडला कि मनपा! जाऊ घरी.अस विचार केला.पुलाच्या अगदी कोपऱ्यावर एक बिडी शिलगावली, थोडे शांत राहून एकदोन झुरके घेतले तोच पंकज उधासच्या गझलची एक ओळ गुणगुणताना एकटाच स्वतःशी हसलो! आता इथे एक स्वगत..."घरी गेल्या-गेल्या पिंकीला मी गाणे गात किंवा ऐकत असताना बोलू नये अशी ताकीद द्यावी लागणार!"
त्याचंही कारण आहे ते असं... मी मागच्याच आठवड्यात पंकज उधासची नशा अल्बम मधली एक गझल ऐकत होतो,सोबत तीही होती, त्याची एक ओळ किंवा शेर असा होता..
"हम ऐसे रींद, जो अक्सर महिनो तक नही पीते[२]
अगर पिणे पे आजे तो, फिर पैगम भी पीते है
तर पहिल्या ओळीतच तिने मला गार केले कारण मीही मन लाऊन म्हणत होतो तोच ती म्हणाली, अक्सर महिनोतक नही पीते म्हणजे 'रीहॅब' मध्ये असतो! आणि बऱ्याच काय माझ्याबाबत तर हे खरेच आहे!म्हणून शांतपणे गाणे गुणगुणायची देखील चोरी!
मग अचानक थोडी गडबड ऐकू आली, कुणाचा तरी कुणाच्यातरी मोटारसायकलला धक्का लागला, त्यावरून हमरातुमरी, तू कोण? मी कोण? तुझ्या आयला..मायला..बघतो..दाखवतो..इत्यादी इत्यादी.त्यातही करमणूक चांगली होते! सिग्नल लागला कि सर्व शांत, खुमखुमी असणारे पुन्हा कुठेतरी भांडतील!
आता जाऊन गाडी पकडावी म्हणून निघालो तोच तीन-चार एकंदर पेहरावावरून आधुनिक आणि कुठल्यातरी विद्यार्थी वाटणाऱ्या मुली, एका सात आठ वर्षाच्या भिकारी मुलीला पाणीपुरी खायला देत होत्या आणि ती भिकारी वाटणारी लहान मुलगी पाणीपुरी अधाशासारखे खात असताना कुणी मोबाईल तर कुणी डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढत होते! आता इथे नवल काही नाहीं, आपण काही सर्व गरिबी दूर करू शकत नाहीं, आपण समाजसुधारक नाहीं, आपले काही देणेघेणे नाहीं हे सर्व मान्य तरी त्या अर्ध्या मिनिटात क्षणभर विचार आलाच कि, कदाचित आपले लग्न झालेले असते आणि व्यसनात अद्याप असतो तर ती मुलगी आपलीच असू शकली असती! असो.
तर या चार पाच मिनिटाचाच विचार केला तरी एकंदर आपण [म्हणजे मी!] कुठे तरी तठस्थ राहू शकत नाहीं हेच खरे! पुढेही गाडीत खरोखर अपंग आणि वृद्धाना जी जागा राखीव असते त्यावर कोणीतरी बसलेले त्यांच्याशी कंडक्टर ची हुज्जत...आपलाही नकळत हस्तक्षेप! त्यापेक्षा आता घरी जाऊन मस्त सिनेमा पाहावा हे उत्तम!!


No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....