"सुखांत" ला जाण्याचे मी १५ तारखेलाच ठरवले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेणुताई गावस्करांनी चांगले इच्छा मरण या विषयवार सेशन घेत्त्ले. [ त्यांचे म्हणणे असे कि, याविषयावर सर्वांनी निबंध वगैरे लिहावा.] आता दोन दिवस बाहेर जाणार आहे तेंव्हा, थोडा मागचा एखादा पेपर मधून संदर्भ किंवा डाउनलोड करू. पण माझ्यामते इथे 'मरण' अपरिहार्यच आहे. जिथे अपरिहार्यता आहे तिथे तो केवळ [इच्छामरण] हा चार बुद्धिवादी, बुद्धीजीवी म्हणवणाऱ्या मंडळींनी काथ्याकुट करीत बसण्याचा प्रश्न आहे.तुलनेत जगणे, जगवणे अवघड आहे. तशी परिस्थिती अगदीच निराशाजनक नाही आपणही चार/आठ पाने लिहून देऊ! असो.
तर सांगायचे असे कि, मी म्हणालो, मी कांही 'कृपा' कडून 'सुखांत' बघायला जाणार नाही.
'बिडीझोन' मध्ये मी 'शांत' बसलो होतो. तेथे कान्हेरे, कोण कोण जाणार याची यादी घेऊन आले. त्यांनी यादी दाखवली आणि माझ्या आणि गोळेंच्या नावावर काट मारली होती. आता उरलेल्या यादीत नावे पाहिली, गोखले, कान्हेरे, गोळे आणि मी! यावर कान्हेरे स्वतःशीच पुटपुटले, 'हा चित्रपट इच्छामार्नावर वगैरे आहे असे समजले. आपले चौघांचे नाव बघून मला आश्चार्य वाटले. कारण 'बाद केस' म्हणून ओळखले जातो! [कौन्सिलरना ताप, घरच्यांना ताप, किती दिवस सगळ्यांनी हा ताप सहन करायचा? म्हणून हा चित्रपट पाहून आत्महत्या करायला प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे हा तर सुप्त उद्देश, हेतू आपल्याला हा चित्रपट दाखवण्यामागे नसावा? कदाचित त्यातून इन्स्पायर होऊन, प्रेरणा घेऊन [आपल्याला इच्छामरण तर कोणी देणार नाही!] पण स्वतः आत्महत्या तरी करू!'
मी म्हणालो, " बरं झालं कान्हेरे हे तुम्हीच म्हणालात हे उत्तम झालं! उगाच मी म्हणालो असतो तर आधीच फुटक्या तोंडाचा म्हणून प्रसिद्धी आहेच, पण मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी आत्महत्या करेल! आपल्या धास्तीने कदाचित इतरांना 'इच्छामरणाचा' कायदा करावा अशी आवश्यकता भासेल!!"
गोळेना विचारले, का जाणार नाही? का इच्छामरणाची वगैरे भीती वाटते? तर त्यांचे दुसरेच! त्यांना म्हणे दोन/तीन तास एका जागी बसवत नाही, सिनेमा चालू असताना मध्ये बोलता येत नाही! इथे इनपुट/आउटपूट माहे दुसऱ्यांना बोलू देत नाहीत, तिथे बाहेर तसे नसते! हे त्यांना उशिरा कळले.पण कळले हे नशीब!
बाहेर गेल्यावर माझेही तसेच आहे एकतर बोलायचेच नाही हा दंडक घालून घ्यावा लागेल! कारण बोललो तर नीट बोलत नाही असा आरोप होतो, आता तर क्वचित संबंध असणारे लोक/मंडळीदेखील आरोप करू लागलीत सकाळीच आमचे मित्र नीलकंठ सर म्हणाले, 'यार कुलकर्णी, कुछ सुनाव, सुनाओ तो अच्छा लागता ही भलेही सामनेवालेकी ****** हो जाती ही, पर अच्छा लागता है! आता पुढे काय बोलणार?
गंभीरपणे कसे बोलावे, याचा कोठे क्लास आहे का? ते पहावे लागेल. कारण चेहरा गंभीर ठेवता येतो![त्यातही फार त्रास होतो हो!] असो.
एकंदरीत सर्वच "सुखांत" नाही हेच खरे!!
समाप्त
No comments:
Post a Comment