मी मागे वारंवार qt मध्ये लिहिले आहे कि, बाहेर गेल्यावर मला जेथे राहण्याची किंवा कुठे राहायचे हा प्रश्न असेल तर मनात दुसरे काही विचार येणे शक्य नाही कारण मला उगाच पुन्हा बहिणीकडे वगैरे राहायचे नाही.
मी 'मुक्तांगण' मधून डिस्चार्ज घेतल्यावर भावाने सध्या पैसे नाहीत तेंव्हा सहा हजारात तू कुठे राहयचे ते पहा असे सांगितले तेंव्हा मला धक्काच बसला. मी दारूपासून दूर राहू शकेन अशी मला खात्री नव्हती अशा स्थितीत मी साहजिकच बहिणीकडे जाने पसंत केले. कारण अजून पैसे दिले तरी मी नीट न पिता राहू शकेन असे वाटत नव्हते. मी पिणार नाही हे माझ्या कौन्सिलर ला देखील ठाऊक होते, ते परत परत येणार नाही अशी खात्री बाळगून होते. [त्यांना कुणी मी बोलताना सांगितले कि, इथे सहा हजारांत छान सोय होते बाहेर गेल्यावर मी नंतर पिईन.] असे तर मी इथेही बोलतो [बिडीझोन मध्ये फाटकांना विचारा!] मला नाही वाटत कुणाचे ऐकून कुणी दारू सडतो, अथवा पितो, असो.
माझा सरळ साधा उद्देश होता कि, आपण कधी अभ्यास वगैरे केला नाही त्यामुळे शिक्षणात मागे पडलो, दारूचे प्रमाण वाढत गेले, घराशी संपर्क तुटला, त्यामुळे जे राहून गेले ते करत बसावे हा साधा उद्देश आहे.
आता दारू नाही तर कशाभोवती तरी मन रमायला हवं. वाचनही शिस्तबद्ध नाही.
पुन्हा दुसरा मुद्दा असा कि, राष्ट्रभाषा हिंदीच्या पहिल्या पाच 'प्रबोध' पर्यंत परीक्षा मी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण आहे आता फक्त पंडित, प्रवीण या दोन पदवी, पदव्युत्तर परीक्षा द्याव्या, म्हणजे तेही वाटले ते पूर्ण होईल.हे सर्व आरामात पाच सहा वर्षे तरी चालेल!खरेतर शिक्षणाला अंत, मर्यादा नसते हेच खरे. परीक्षेत पास होणे हे काही महत्वाचे नाही कारण माझ्यामते परीक्षेत पास होण्याइतकी सोपी गोष्ट कोणती नाही, महत्व काहीतरी समजण्याला आहे, कामापुरता पैसा असेल, तर मग पैसा कशाला? किंवा नोकरी कशाला? हे सर्व करण्यासाठी पैसा नसेल तर नोकरी! वेळ जात नाही म्हणून नाही कारण वेळ कसा घालवायचा हे मला ठाऊक आहे. आठ तास जात नाहीत म्हणून नाही. तसे असेल तर पुन्हा आहे ती नोकरी काय वाईट?
शेवटी मी उल्लेख केल्याप्रमाणे सांगितले कि, मला गुत्ता, व्यसनमुक्ती केंद्र दोन्ही आवडतात कारण येथे वृत्ती/प्रवृत्ती सारखीच असते कारण मला माणसांत किंवा नाटक, सिनेमा, पुस्तकांत रमायला आवडतं.त्यामुळे इथे करमण्याचा वगैरे तर प्रश्नच येत नाही. पण जर प्रश्न पैशाचा असेल तर मात्र नोकरी, जमीन [याबद्दलही वेगळी एक रिजाइनमेंट आहेच!] हवी. कारण पैशाची उब बरेच कांही देते. भावाशी बोलल्यावर बरेच काही स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment