आज करमत नव्हतं, म्हणून विचार केला कि, थोडे वाचत बसावे, पण एकजण म्हणाला, किती वेळ राहिला असा राहिला आहे, आणि वाचून वाचून काय वाचणार? टीव्ही बघू. पण तिथे मनासारखे काही नव्हते. मग तसेच खेळायला गेलो, आल्यानंतर हॉल मध्ये अभय हस्तलिखिताचे कांहीतरी करीत होता, तिथे मी म्हणालो, मी एक कविता लिहिणार आहे. दोघेचौघे आश्चर्याने पाहू लागले. कविता आणि मी? अशा अविर्भावात!तेंव्हा त्यांना समजावून सांगावे लागले कि, पाच वाजता नोकरीहून येण्यासाठी एक एस टी होती, ती शेजारच्या गावी जी, ती परत येई तोपर्यंत जी दारूची क्रेव्हिंग, तडफड होई, हातपाय कापणे , ओकाऱ्या,मळमळ वगैरे. तसेही पाच वाजेपर्यंत मी क्वचितच थांबलो! पण जेंव्हा थांबलो तेंव्हा अशी वेळ येत असे. तर ती तडफड काव्यातून का व्यक्त नये?
ओढून-ताणून चौदा ओळी जमवल्या, का? तर चौदा ओळींच्या कवितेला सोनेट [सुनीत]म्हणतात म्हणे!
बरं, उद्या एखाद्याने दारूचे अनुभव श्लोकात लिहा, किंवा जपानी हायकूत लिहा असे म्हंटले तरी नाही म्हणणार नाही! वृत्त, आर्या, यमक वगैरेचा काही संबंध नाही, मात्रेची भानगड नाही, नवकाव्याच्या नावाखाली काहीही लिहितो तो खरा नवकवी!
यात मी पुन्हा गंमत म्हणजे खाली संदर्भासहीत स्पष्टीकरण देणार आहे! कारण शीर्षक 'येशील कधी परतून?' म्हंटल्यावर उगाच गैरसमज नको!
नमस्कार,
आपल्यामध्ये कदाचित नीट संवाद होऊ शकत नाही त्यामुळे उद्या तुमचा भाऊ आल्यावर त्यांच्यासमोर आपण सर्व मुद्द्यांवर सविस्तर आणि कॉक्रिट बोलूया.
आमच्या कुणाच्या समाधानासाठी नाही, पण तुम्हीच व्यसनाला कंटाळला आहात म्हणून तूनही व्यसनापासून दूर रहायचा निर्णय घेतला, त्याबद्दल अभिनंदन, प्रत्यक्ष भावी आयुष्यात काय करायचे हे आपण एकमेकांच्या संमतीने ठरवूया.
संगीता जोशी मॅडम
No comments:
Post a Comment