Friday 12 February 2010

दोष व प्रीती


दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे;
दोष परी मजला हाच मला वाटे,
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?
दोष असती जगतात, असायाचे;
मला त्याशी तरी काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्धसिंचने हि
शुद्ध होई न जो, दोष असा नाही;
गाड्या पूर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्यूना! ये मार मिठी देही
प्रीती माझी हृदयात करी वास
न्युनत्वेला पूर्णत्व द्यावयास!

बालकवी
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....