Wednesday, 3 February 2010

02-12-2009

मी मागे लिहिल्याप्रमाणे काही गोष्टी स्पष्ट होतील. तसेही न दारू पिता बराच विचार करता येतो.
नकारात्मक असो कि सकारात्मक, विचाराला कृतीची जोड द्यायची नाही हे दारूमुळे होते. हे कळते पण वळत नाही!
दहा वर्षांपूर्वी मी कांही समांतर तीन पातळ्यात जगात होतो. त्यापैकी एका पातळीवर जाऊन फक्त एकदा इथे वर्तुणूक करून पहिली.[साडेचार महिन्यात फक्त एकदा] तर ताबडतोब एकाने माफी मागितली. हे फक्त दारू न पिता होऊ शकते. वागणे आक्रमक असो [कधी प्रतिसादही दारू पीत असताना तसा मिळे] वा कसेही पण काय ते रोखठोक होते.
रिजाइन्मेट घ्यायची ठरवली तरी त्यासाठी दारूपासून दूर राहणे आवश्यक आहे. आवश्यक वाटते.
कारण अन्याय झाला/वाईट वागलो, नशेत होतो, 4th स्टेप करा यापेक्षा मुळात जाऊन प्रश्न संपवा हे उत्तम! त्यामुळे बाष्फळ बडबड, व्यर्थ लिखाण करण्यापेक्षा कृतीवर भर देईन कारण निदान त्याने मी दहा वर्षापूर्वी जसा होतो तसा राहता येईल.

नमस्कार,
तुमचा त्या दिवशीचा प्रतिसाद फारच अनपेक्षित होता. आंम्ही तुमच्या हितासाठी काहीतरी छान करण्याचा विचार करत होतो, मात्र कदाचित तुम्ही वेगळ्या मूड मध्ये किंवा विचारात असाल. तरीदेखील मला हेच सांगावेसे वाटते कि, आपल्या आयुष्याची प्राथमिकता व्यसनमुक्त राहणे हेच गरजेचे आहे. सोमवारी बोलूया.
संगीता जोशी मॅडम



No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....