आज ए.ए. मिटिंगला जायचे असल्याने थोडाच वेळ आहे, तरी तुम्ही जो प्रश्न विचारला होता की, lust किंवा वासना यापेक्षा काही बाबतीत स्वतःला सिद्ध करणे हा हेतू असतो का? तर उत्तर निश्चितच होय असे आहे. ब-याचदा केवळ सेक्स पुरता नाही तर इतर सर्व बाबतीत performance मधील कमी हे आणि त्या अनुषंगाने येणारे न्यूनगंड आणि योग्य मार्गदर्शन न मिळण्याचा तो माझ्यामते एकत्रित परिणाम असतो.
वय इथे महत्वाचे नाही, तर दृध्तीकोन इथे महत्वाचा आहे. कारण स्थळ, काळ वेळ यांचे भान न ठेवल्याने घडणारे मनोरंजक किस्से देखील मला ठाऊक आहेत. असो.

आता स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे हे कबूल करावे लागते त्यामुळे जोर देऊन आठवावे लागते तेंव्हा कांही प्रमाणात माझ्या आत्मकेंद्रित (दारूसंबंधी, कारण इथे माझे हित नाही) स्वभाव किंवा वर्तन यांचे निकोलो मॅकव्हली याच्या म्हणण्यानुसार, मनुष्य हा जन्मत: धूर्त, लबाड, कापडी, आणि कोल्हयाप्रमाणे असतो, स्वार्थी असतो. इतरांचा स्वार्थ हितासाठी आणि इतर कशासोबत असेल मात्र माझ्यासारख्या दारुड्याचा स्वार्थ हा केवळ बाटलीभोवती फिरत असतो!
स्वार्थासंबंधी मनुष्याच्या जन्मजात कशा प्रेरणा असतात, हे विश्वास पाटील यांच्या झाडाझडती या कादंबरीत एका खेडवळ बाईच्या तोंडून, जी विस्थापित, धरणग्रस्त आहे. सांगतात.......
'मास्तर, माणसाची जातच मतलबी. मनुष्य जन्माला यायच्या आधी पोटात फार अडचणीत असतो, त्याला बाहेर यायचं असतं, पण आईला व त्याला त्रास होणार असतो, तो देवाला विनवणी करतो की, सोडव यातून....देव स्वयंभू असल्याने त्याला आईचे दूध माहित नसते, ते त्याच्यासाठी मौल्यवान असते. तेंव्हा बालक त्याला आईचे दूध देयचे कबूल करतो. देव हा त्रास सोडवून त्याला जन्माला घालतो तेंव्हा देव म्हणतो, आता माझे दुदु (दूध) दे! यावर लबाड बाळ म्हणते....कवा sss कवा sss (केंव्हा?केंव्हा?मुळात ते ट्या असे वाटते) मी असे कवा म्हणालो? मी दूध देतो असे म्हणालोच नाही. अजूनदेखील बाळ दुध पिताना इकडे तिकडे देव दिसतो का ते पाहते!आणि देवाने दूध मागितले तर रडते आणि त्याला विचारते,.......कवा sss कवा sss ....

No comments:
Post a Comment