Tuesday 23 November 2010

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायचे म्हणून;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.

डरतात त्या वादळांना जे दास त्या धृवाचे;
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे.

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे;
हे जाणतो जायला वाटेल तेथ न्यारे.

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

विंदा करंदीकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी




No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....