एक सांगा, दिवसाकाठी किती वेळा, 'कळतं पण वळत नाही', 'पटतं पण वठत नाही', 'समजतं पण उमजत नाही' अशा अर्थाचे शब्द वापरता? खूप वेळा! हो की नाही? मग वाचा पुढे आणि असं म्हणावं लागत नसेल तर तुम्ही बुवा हुशार! मग तर जरूर वाचाच.
खरं पाहता, कळतं पण वळत नाही, हा तिढा सॉलिड ढासू आहे; म्हणजे भले भले आडवे होतात. अगदी मेनकेला पाहून पाघळणा-या विश्वामित्रापासून ते टिव्ही, दारू, सिगरेटी, चकाट्या पिटणा-या सोमाजी-गोमाजीपर्यंत, सगळे 'कळतं पण वळत नाही'चे बळी ठरतात. त्यामागचा फंडा काय आहे, ते पाहू. आपल्याकडे ज्ञान अथवा माहिती असते, पण स्वतःचं भान नसतं.
ज्ञान आहे पण भान नाही, असं झालं की वांधेच वांधे.
ज्ञान आहे पण भान नाही, असं झालं की वांधेच वांधे.
म्हणजे महावीर अर्जुनाकडे धनुर्विद्येचं ज्ञान होतं. युद्ध करायला हवं हे कळत होतं, पण वळत नव्हतं. कारण आपण ते युद्ध का करतो आहोत, याचं भान नव्हतं. भानाशिवाय ज्ञान म्हणजे कीबोर्डशिवाय सीपीयू. त्यामुळे आपण सतत भानावर राहिलं पाहिजे.
आपल्याला जे कळतंय किंवा कळल्यासारखं वाटतंय, ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सतत भानावर राहावं लागतं. स्वतःला चुका करण्यापासून रोखण्याचं आणि अचूक कामं करण्याचं भान ठेवावं लागतं. तेंव्हा भान बाळगा. सदैव जागृत राहा. वास्तवात राहा. भानावर येण्याची आज सुरुवात करा, हो आता.
हॅव अ 'भानावर राहण्याचा' डे!
'हॅव अ नाईस डे'मधून
संकलन:प्रवीण कुलकर्णी
हॅव अ 'भानावर राहण्याचा' डे!
'हॅव अ नाईस डे'मधून
संकलन:प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment