Saturday 16 October 2010

02/06/2010

रोल आणि जबाबदारी याविषयी मी बोलेनच. कारण तो एक weakness आहे. पण आजचा दिवस only one आशीत सरांचा होता हे सांगावेसे वाटते.
तसे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला दोन वर्षांची कालमर्यादा घालून दिली होती...अगदी कुणीही न सांगता. p g करणे, यात पास नापास असे कांही नसते पासच व्हायचे तर दोन तीन प्रश्न पुरेसे असतात. मी उगाच येथे समीक्षात्मक वगैरे सोब्रायटीवर बोलत राहीन तर यात कांही अर्थ नाही. टी माझी गरज होती. कदाचित चुकीचेही असले तरी मी माझे स्वतःचे असे कांही टास्क ठरवले होते. पण आर्थिक, नोकरी वगैरे बाबतीत मला माझ्या मर्यादा ठावूक आहेत. यात कांही न्यूनगंड, संशय असा भाग नाही. असो.
अजून एक बाब म्हणजे एकदम आर्थिक व्यवहार करणे, पैसा बाळगणे, लग्न हे विषय मी दोन-तीन वर्षांकरिता थंड्या बस्त्यात ठेवले आहेत. कारण सद्यस्थितीत किमान 'माणूस' य पातळीवर जगता येत असेल तरच त्याला कांही अर्थ आहे. पैसा, पैसा म्हणण्यापेक्षा दारू असली कि मी जनावरांच्या देखील खालची पातळी गाठतो.
यावेळी जरी पुन्हा सुरुवात असली, तरी मी नक्कीच आशादायक आहे. कारण नाकारण्याची भावना मनात नाही. जे घरच्याना मी टाळतो त्यामागे मी सांगितल्याप्रमाणे आयुष्यात घरी-दारी मला चांगलीच मनसे भेटली. पण मी कांही त्यांच्या लायक नाही ही गोष्ट सतावते. असो.
तर, इनपूट झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया चहा पिताना ऐकल्या...
१ भारावलो.
२ प्रभावित झालो.
३ अंगावर काटा उभा राहिला (आणि दाखवला देखील!)
४ एक म्हणाला, 'अभिनेते आहेत! त्यात काय विशेष?'
इत्यादी इत्यादी...पण....पण माझ्यामते, माहिती आणि ज्ञानाला जर अनुभवाचा स्पर्श असेल तर ते अगदी सहज मनातून येते. हे आशीत सरांच्या इनपुट मध्ये जाणवले. आणि आपली देखील दिशा योग्य आहे हे समजले. पण इनपुट बाबत मात्र पुन्हा अंतर्मुख झालो (हो! लोक डॉक्टर, वकील, खासदार, आमदार होतात. आपल्याला काहीच जमले नाही! निदान म्हटलं, 'अंतर्मुख' तरी व्हावं!!) आणि कधी कधी जास्त वेळा देखील होतो ते वेगळेच!
तेंव्हा, जेंव्हा केंव्हा मी 'सुधारण्याची' परिभाषा करतो, तेंव्हा...समोरच्याला, अगदी तुम्हाला देखील म्हणतो, "मला अगदी साने गुरुजींच्या 'शाम' सारखं व्हायचं नाही!"
म्हणजे काय? तर, माझ्या मनाचा एखादा छोटा कप्पा खरोखरीच 'शाम' असतो. पण एकंदर जसा मी वीस वर्षे दारू पितो, तसा माझा 'आतला आवाज' (हो! मला देखील आतला आवाज आहे ती केवळ सोनिया गांधींची मक्तेदारी (monopoly)
नाही!!)
तर, माझा आतला आवाज सांगत असतो, कि नाही, तू तसा नाहीस!
पण खरे पाहता, तसे राहायला काय हरकत आहे? सोज्वळपणा आणि भोळेपणा काही वाईट नाही! त्यातल्या त्यात भोळेपणा तर हवाच! निदान open mind राहायला ते एक धारदार शस्त्र आहे. असो. कारण पुन्हा तुम्ही म्हणता ते सत्य आहे कि, स्वतःला माफ करता आले पाहिजे. पण ते कांही जमत नाही. कारण परत परत तो कोडगेपणा वाटतो.
कदाचित मी नाटक तर करत नसेन अशी शंका कोणी घेईल य विचारानेही धास्तावतो. कारण रंजनाकडे झुकणारा असला तरी दिनक्रम हा आखूनच घेतला होता. त्यामुळे मी य बाबींकडे फारसे गांभीर्याने बघत नाही. शेवटी आता नेमकेपणाने सांगायचे म्हणजे स्वतःच्या विचारातील किंवा विचार करताना, अगदी लिहिताना दिखील 'तू तसा नाहीस' हे आठवणे, हे येणे हे सकारात्मकरीत्या घेता येईल का?


नमस्कार,
हो नक्कीच घेता येईल. एकुणात वास्तवाचा acceptance येणं हे फार गरजेचं आहे. मी आळशी आहे असं जर लक्षात आलं, तर either  हे अविवेकी आहे असं वाटून त्यावर action घेणं जरुरी आहे, नाहीतर ते accept  करून त्यानुसार काहीतरी ठरवणं भाग आहे. पण जसा आहे, तोच जर आवडलो नाही, पटलो नाही, तर conflict मध्ये घुसायला होतंच.
तर ही clarity तुम्हाला आहे हे छानच. मला शाम व्हायचं नाही, पण काय व्हायचं आहे? ह्यावर विचार झाला आहे का?
माणसाला कित्येकदा काय नको, हे पटकन उलगडतं. पण काय हवं ते समजतंच नाही. तर यावर बोलू. पण बुद्धी आणि शरीर दोन्हीला ताण येईल असं काही शोधाल तर छान.



वैशाली मॅडम
  
 

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....