Monday, 25 October 2010

04/06/2010

आज थोडं बोअर होत होतं म्हणून बुद्धीबळ खेळलो. मला तशी बुद्धिबळात फार गती आहे अशातला भाग नाही, पण त्यात माझे अविचार आणि असंयम जाणवतात. कारण खेळ अगदी रमी असो वा बुद्धीबळ, हे मी खेळाच्या बाहेर राहून उत्तम आकलन करीत असतो. त्रासेच ते इतरही करतात. त्यांना खेळाडूपेक्षा जास्त कळतं. कारण खेळणारा "मी" हा नेहमी एखाद्याच सोंगटी अथवा मोहरा किंवा चालीवर लक्ष केंद्रित करतो. त्यावेळी समोरचा (माझ्यादृष्टीने) अनपेक्षित खेळी खेळतो. माझे नुकसान बाहेरच्याला दिसते, ते हळहळतात, की याचा वजीर मारला गेला वगैरे. पण या बाहेरच्याला जाणवतं ते मला जाणवत नाही कारण माझे विचार किंवा खेळातील डावपेच निराळेच असतात. आणि समोरचा ते उलटवतो, तेंव्हा साहजिकच अपेक्षाभंग होतो. माझ्या मते, घराचे अथवा कौन्सिलर्स हे बाहेरून बघणारे सारखे असतात. त्यामुळे हा लेखनप्रपंच करावा लागतो. असो.
मी मागच्या रीलॅप्स  आणि त्याच्या कारणांची तपासणी केली तर घटना (मी त्यांना कारण मानतो हे मी अविवेकी आहे हे सिद्ध होते!) वेगळ्या असल्या तरी त्यामागे 'अपेक्षाभंग' हेच मूळ होते. मग त्यावेळी "आशा" हे सर्व दु:खांचे मूळ आहे हे माहित नव्हते काय? तर तसेही नाही. पण यावेळी मी म्हणालो तर reaction ला वेळ कमी होता, तरी पिणार नव्हतो हे निश्चित. पण एकाच चेतनेला एकाच प्रतिसाद देण्याची जणू सवयच लागलेली आहे. ती बदलवण्याचा प्रयत्न करावा लागेल असे वाटते. कारण मागच्या वेळी काहीही झाले तरी दारूचा प्रतिसाद देणार नाही असे म्हणालो खरा मात्र तेच केले!
ret किंवा अन्य तंत्र वापरण्याची प्रगल्भता अजून कदाचित आली नसावी. (भावनात्मक विकास वगैरे जड शब्द इथे मुद्दाम टाकत नाही. कारण मग, तुम्ही विचाराल, ;तुझा भावनात्मक विकास झाला नाही हे तुला कसे कळले? हे आम्ही सांगायचे असते!) काही असले तरी माझ्या व्यसनाधीनतेच्या संदर्भात बराच (म्हणजे किती?) स्वतःशी विचार केला होता. पण विचार करणे म्हणजे तरी काय? उमराणी सर म्हणतात तसे कदाचित सुप्त विचार असेलही. पण आता थोडे सावध राहायला हवे असे वाटते कारण एका वाचलेल्या संदर्भात एका निर्जन स्थळी दोन मनुष्य असतात, एक म्हणतो हळदीचा रंग काळा असतो..दुसरा ऐकण्यास तयार नसतो. दुसरा ऐकण्यास तयार नाही तर साक्ष कुणाची काढणार? तू वर्षानुवर्षे पिवळी हळद पहिली आहेस तेंव्हा तू रंगाधळा नसशील कशावरून? तेंव्हा शहाण्या माणसासारखे 'असेलही-नसेलही' म्हणायला शिकले पाहिजे. 

सर्व विचार व भावनांवर माझे नियंत्रण असायलाच हवे हा अनाठायी अट्टाहास सोडला पाहिजे. त्या मुळे नुकसान झाले आहे.
हे सर्व लिहिताना मी इथे 'कृपा' मधून पेशंट घरी गेल्यावर कसे वागतील ret आणि मानसशास्त्रीय भाषे कसे बोलतील,  असे लिहिले होते, मात्र मी देखील हल्ली थोडं तसा वागू लागलो आहे! (हे सविस्तर लिहीन) मी इथून गेल्यावर 'कृपा'च्या मिटिंग जाणीवपूर्वक नियमित केल्या. तेंव्हा घरी बोलताना साहजिकच, 'मॅडम असे म्हणतात, सर असे म्हणाले असा संदर्भ येतो!" इतकेच काय संदर्भ काही असो कधी पूर्ण वाक्य देखील (नक्कल न करता) म्हणतो!
घरी 'मानसिक व्यायाम'(!) म्हणून मिथुन, धर्मेंद्र यांचे सी ग्रेड सिनेमे नेट वर लावून बहिणीला संगे, 'आता बघ हं, पहिल्या दहा ते पंधरा मिनिटात सर्व १२  irrational believe काढून दाखवतो!
आता कधीकधी असे चित्र डोळ्यासमोर येते, (कारण आता दिवास्वप्नात राहायचे नाही तर कल्पनाशक्तीला थोडी चालना तरी दिली पाहिजे!)
तर असे चित्र तयार करा की, असे भिकार, टुकार चित्रपट तुम्ही,
ॅडम, सर कसे बघाल? मुळात ते तुम्ही सहन कसे कराल? त्यासाठी छान चित्रपट....मिथुन चक्रवर्ती  चे सर्व!! 


नमस्कार,
तुमचा QT वाचायला खूप आवडतं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. की मी सतत rational च राहायला, विचार करायला हवं हा देखील अट्टाहास आहे तसं असण्याची गरज नाही.कारण त्याचेही दडपण येतं. यामुळे स्वतःच्या भावना, त्यांचे चढ-उतार विचार (rational as well irrational ) हे आहेत तसे accept करणे हे rational वागणे आहे. स्वतःच्या मर्यादा मान्य करणं हेही गरजेचं आहे. आज आपण पहिले की demanding हे खरोखरीच emotional disturbance च मूळ आहे. उरलेले तीन हे त्यातूनच होतं असे अल्बर्ट एलीस म्हणतो. तर तुम्हीच नव्हे तर बहुतांश लोकांना हा problem असतो.
by the way मी व करकरे मॅडम टुकार सिनेमे regularly बघतो. सहन करतो!!

वैशाली
ॅडम 


No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....