Tuesday, 10 August 2010

31/05/2010

खरं तर हजार हात असते तर हजार विषय आणि घटनांवर किंवा विचारांवर लिहिता आले असते. मागच्या वेळी माझा फोकस विशेषत: आर्थिक सुरक्षिततेवर होता. आजही नाही असे नाही, पण मी इथे येताना आई म्हणाली, थांब, जाऊ नको, आता बंद कर! पण मी फक्त आज पितो उद्यापासून बंद असे सांगत होतो. त्यावर ठाम होतो. त्यावेळी भावाने मॅडम काय म्हणतात ते पहा असे सांगितले, इथे आलो नसतो तर कदाचित थांबलोही असतो पण तात्पुरता. हे आठवायचे कारण म्हणजे आज सकाळी योगच्या वेळी दरीची घडी घालताना ती माझ्याकडून चुकीची घातली गेली. त्यावर नीलकंठ सरांनी व्यवस्थित घालून दिली व घडी घालताना त्यांनी विचारले, "क्यों प्यारे, प्रोग्राम भूल गये?"यावर हसून म्हणालो, "लागता तो ऐसाही ही!"
यानंतर आर. इ. टी. च्या सेशनमध्ये तुम्ही माझ्या वहीतील मराठीतील अतार्किक समजुती इतरांना देण्याविषयी सांगितले! वास्तविक मी इंटरनेट वर तुरळक वगळता याविषयी कांही वाचले नाही किंवा लक्षही दिले नाही! पण कितीही नाही म्हटले तरी कांही ना कांही लक्षात राहातच असते. पण त्याचा कृतीत आणण्याचा सराव नसतो, तो व्हावाच लागतो, नव्हे करावाच लागतो!
तसेही माझ्या आयुष्यात कांही फार मोठ्या आणि खळबळजनक अशा घटना नाहीत. (हे मिनिमाइजेशन नाही!)
काही असले तरी त्याचा फार त्रास नाही. पुढेही फार कांही घडण्याचा संभव नाही मात्र, ज्या छोट्या घटना किंवा प्रसंग असतात त्या तरी कुठे नीट हाताळता येतात? माहिती हि बाबच गौण आहे. {याबाबत माहिती आणि ज्ञान आणि माझा वेडेपणा याविषयी एकदा सविस्तर लिहायचे आहे} पण जी माहिती आहे तिचा मी वापर करतो का ? किंवा कसा करतो? याबाबत एक गोष्ट आहे टी सहज आठवली...ती अशी....
एका जंगलात एका साधू महाराजांचा आश्रम असतो. तिथे ते एकटेच ध्यान-साधना करीत असतात. ते एका कुटीरात वास्तव्य करीत असतात. एके दिवशी त्यांना एक सुंदर, आकर्षक, आणि बोलणारा असा एक दिव्य पक्षी सापडतो. ते त्याला पाळतात. पण ते इकडे असल्याने आणि ध्यान धारणेत चार चार दिवस बसत असल्याने ते त्याला व्याध (शिकारी,पारधी) यांच्या जाळ्यात सापडू नये म्हणून ज्ञान(?)देतात.
'शिकारी येईल...दाणा टाकेल...जाळे टाकेल..अडकशील...'
पक्षी हे तोंडपाठ करतो...
'शिकारी येईल...दाणा टाकेल...जाळे टाकेल..अडकशील...'
एके दिवशी साधू महाराज ध्यान करण्यास निघून जातात. तेंव्हा तेथे खरेच शिकारी येतो! जाळे पसरतो. व वाट पाहत बसतो.
आपला हा पक्षी एक एक दाणा टिपीत जाळ्याच्या दिशेने जात असतो पण जाताना मात्र म्हणत असतो...
'शिकारी येईल...दाणा टाकेल...जाळे टाकेल..अडकशील...'!!!

नमस्कार,
तुमचा Q.T.
वाचायला खूप मजा येते. I look forward. दोन्ही किस्से भारी!!!(गोष्ट+मुक्तांगण मधला)
इतका awareness
असलेल्या माणसाला सांगावं तरी काय? पण परत application हाही खूप मोठा विषय आहे. कारण आपण इथं time & again पाहतो की theory पाठ असून भागात नाही..शेवटी वर्तनातून दिसावं लागतं. इतरांना हे सहज सांगता येत नाही की सुरुवातीला सोपं करावं म्हणून असं सांगते की, start with -role नुसार तुम्ही responsibilities घ्यायला लागा. वर्तनात आपोआप एक routine व शिस्त येते. पण तुमच्या बाबतीत या गोष्टी धूसर आहेत. त्यामुळे ते सोपं करून सांगता येत नाही. असो.
तुम्हीच मला सांगा की, ret चे प्रत्यक्षात आणणं कसा करावं? आपण बोलू.
वैशाली मडम



No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....