Friday, 16 July 2010

एका दारुड्या {सोबर} बापाचे {कृपा} मधल्या गुरुजींना हे पत्र....


अब्राहम लिंकनच्या हेडमास्तरांना पत्रातील कांही शब्द आणि इथे{कृपा} सतत कानावर आदळणारे सोबर, सोब्रायटी असे कांही शब्द आणि क्वचित स्वतःचा एखादा शब्द घालून हे "एका दारुड्या बापाचे, जो आता कृपाचा एक्स पेशंट आणि सोबर ए.ए. मेंबर आहे,त्याचे रीह{कृपा} मधल्या गुरुजींना हे पत्र.....अब्राहम लिंकनच्या हेडमास्तरांना पत्राच्या चालीवर एका दारुड्या {सोबर} बापाचे {कृपा} मधल्या गुरुजींना हे पत्र....


प्रिय गुरुजी,
सगळीच माणस मद्यप्रिय नसतात
नसतात सगळीच मद्यमुक्त
हे शिकेलच माझा मुलगा कधी-ना-कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा-
जगात प्रत्येक दारुड्यागणिक
असतो एक 'सोबर'ही
स्वार्थी हितसंबंधी असतात जगात...
तसे असतात मद्यमुक्तीसाठी अवघं आयुष्य
समर्पित करणारे महात्मेही (जसे : फादर जो)
असतात टपलेले (अविवेकी) विचार
तसेच जपलेल्या भावनाही


मला माहित आहे, सगळ्या गोष्टी
झटपट नाही शिकवता येत...तरीही
जमलं तर त्याच्या मनावर ठसवा,
पहिलाच घोट घटक आहे
कितीही फुकट मिळाला तरीही


(मद्यासमोर) हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा 'सोब्रायटी' चा आनंद संयमानं घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर (उच्च शक्ती)
त्याला स्वभावदोषांपासून दूर राहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला

"ऑब्सेशन"ला भीत जाऊ नको म्हणावं
त्याला नमवणं सर्वात सोपं असतं!

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला
मद्यमुक्तीच अद्भुत वैभव,
मात्र त्याचबरोबर,
पाहू दे त्याला, जीवनातलं प्रखर वास्तव
कडक उन्हात वणवणणारी माउली अन
बापाविना झोपडपट्टीत खितपत पडलेली मुलं

'कृपा'त त्याला हा धडा मिळू दे--
{स्वतःला} फसवून प्यालेल्या मद्यापेक्षा
सरळ स्वीकारलेलं दारूडेपण श्रेयस्कर आहे


ए.ए.चे विचार,कल्पना
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा त्यानं फोर्थ स्टेप करावी
आणि गुणदोषांची नोंद करावी


माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा--
(स्लीपरी प्लेसेस) निसरड्या जागांकडे धावत
न सुटण्याची ताकद त्यानं कमवायला हवी
पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं शेअरिंग, अगदी सर्वांचं
पण पडताळून पाहावं, तुलना न करता
अनुभवांच्या चाळणीतून


सरसकट नसतील कदाचित सर्व अनुभव त्याला
पण ओळखावेत स्वतःशी निगडीत असतील ते...
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा
ए.ए.चा १२ स्टेप प्रोग्राम
आणि म्हणावं..
शेअरिंग करायची लाज वाटू देऊ नको
त्याला शिकवा
उच्च शक्तीचे महत्व
आणि स्वभावदोषांपासून लांब राहायला

त्याला पुरेपूर समजवा की,
करावी नुकसानभरपाई त्याने
नवव्या पायरीनुसार, पण
कधीही दर्शवू नये -- दिखावू वरवरपणा!
सोब्रायटीत टोमणे मारणा-यांच्या झुंडी आल्या तर
कानाडोळा करायला शिकवा त्याला
आणि ठसवा त्याच्या मनावर
'सोबर' जगण्यासाठी पाय रोवून लढत रहा!


त्याला ममतेने वागवा पण
दिनक्रमासाठी शिस्तीचेही महत्व पटवा..
"कृपा" मधून निघाल्याशिवाय
व्यसनाधीनाचा 'सोबर' होत नाही

त्याच्या अंगी बाणवा
परिस्थिती बदलण्याचे धैर्य
अन धरला पाहिजे धीर
जर राहायचे असेल 'सोबर'
आणखीही एक सांगत रहा त्याला --
आपला दृढ विश्वास पाहिजे ए.ए.वर आणि स्वतःवर
तरच राहशील अखंड 'सोबर' सातत्याने
आणि लुटू शकशील ,
ख-या 'सोब्रायटी' चा आनंद

माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे
पण पहा...जमेल तेवढं अवश्य कराच
माझा मुलगा....भलताच बेवडा आहे हो तो !!


प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....