क्वाईट टाईम मध्ये आता अजून काही लिहावेसे वाटत नाही असे नाही मात्र ब-याच प्रश्नांची उत्तरे येथे न विचारताच मिळतात. त्यामुळे जरी असे असले तरी आज नेमके काय वाटते हे सांगण्यासाठी लिहिणे अगत्याचे वाटते.
आपल्याला सेल्फ विषयी काय वाटते हे आयेशा मॅडमनी सांगितले. तसे स्वतःशी थोडा विचार केला, रीडिंग मध्ये काही समजले. तसेच कांही उमराणी सरांच्या आउटपूट मध्ये.
माझा रीलॅप्स होणारच नाही, असे मला वाटत नव्हते, पण त्यासाठी काही कालावधी अजून जायला हवा होता किंवा इतक्या लवकर होणार नाही असे पक्के ठरवले होते. पण अपराधी भावना देखील चांगली असते हे उमराणी सरांनी सांगितले. पण त्याचबरोबर विचार व वर्तन बदलण्याची जबाबदारी आपलीच असते हेदेखील. तेंव्हा आता रीलॅप्सचा विचार बाजूला ठेवला आहे.
हे आणि जसे ए.ए. च्या बारा पाय-यात उल्लेख आहे तसा आत्मकेंद्रितता वाढू लागली आहे हे देखील समजू लागले आहे.
पण आताचे कितीही विश्लेषण केले तरी, शेवटी चूक आपलीच असली तरी दुसरी क्वार्टर पिताना मनात हा विचार साफ होता...की, दारूच प्यायची तर 'तिथे' नकार का दिला? पण दुस-याच क्षणी या विचाराचे रुपांतर एका अर्थाने हास्यास्पद अहंकाराचे दर्शन होण्यात झाला...
कारण आतापर्यंत २० वर्षांत झोपडपट्टीत दारू पिण्यात गेली असल्याने अशा कृत्यांचे घरी उल्लेख होत नसत, पण आता होतात त्याचे वाईट वाटते. आणि दुसरी बाब..मी हास्यास्पद अहंकार म्हणतो ती अशी की, मी आतापर्यंत हमाल,रिक्षावाले, भिकारी, फकीर, मलंग इतकेच काय पण महारोग्यांबरोबर दारू पिली आहे..मात्र,एखाद्या ***बरोबर? ज्याला आपण भिकारी, महारोग्यापेक्षाही तुच्छ लेखतो त्यांच्याबरोबर दारू हा आपला चॉइस नाही म्हणतो, त्यांच्याचबरोबर सुखाची अपेक्षा ठेवणे हा विरोधाभास आहे! आणि अहंकाराच आहे दुसरे काही नाही.
आता एका अर्थाने विचार बदलाने म्हणजे नेमके काय?
सेल्फ टाॅक किंवा स्वसंवाद कसा असावा?याबद्दल मार्गदर्शन हवे. ही घटना महत्वाची नसली तरी एकत्र तुम्हाला कळावे आणि पुन्हा याविषयावर बोलायचे बाही असे ठरवल्याने दुर्लक्ष केले किंवा क्षुल्लक मानली तरी ज्या घटनेला रीलॅप्सला कारणीभूत त्यावेळी तरी मानले होते. कारण आतापर्यंत यापेक्षाही जास्त पैसा हातात होता, म्हणून जुगार खेळला नाही की, तसे विचार केले नाहीत. उलट कधी आळंदीसारख्या ठिकाणी जाऊन आलो!
प्रत्येक भावना खरीच असते, ती नाकारायची नसते हे जरी मान्य केले तरी, मी व्यसनी असल्याने एखाद्या भावानेसोबत वाहत जाणे हा स्वभावधर्म झाल्याचे लक्षात असूनही ते मी विसरतो.
हे लिहिताना असे वाटते, की दवाखान्यात काम करत असताना थोड्या चिरफाड केल्या आहेत, त्यात मला टाके नीट घालता येत नसत, हेही तसेच वाटते!!
हे लिहिल्याने, मी कधीच सुधारणार नाही असे सतत जे वाटत राहते ते वाटणे कमी होईल असे वाटते.
No comments:
Post a Comment