Monday, 26 July 2010

26/05/2010

आज वही मिळाली नसल्यामुळे रिमार्क्स वाचता आले नाहीत, त्याविषयी उद्या समक्ष बोलेन. असो. इनपूट आणि आउटपूट विषयी सांगायचे झाल्यास कितीदा देखील एखादा विषय झालेला असला तरीही तो एखाद्या ह.भ.प.महाराजांच्या निरुपणासारखेच असते. आज तत्वज्ञानाचा विषय निघाला, तर प्रश्न जर तत्वज्ञानाचाच असेल तर माझ्या मते, प्रतेक गोष्टीत तत्वज्ञान असते. अगदी दोन माणसांत गलिच्छ आणि अभद्र भाषेत चाललेल्या शिवीगाळीत देखील तत्वज्ञान असू शकते. नव्हे असतेच!ते प्रत्येक गोष्टीत असते. आणि प्रत्येकाने ते स्वतःपुरते शोधायचे असते.स्वतःपुरता त्याचा शोध घ्यायचा असतो.
यासंदर्भात जी.ए. यांच्या कथेतील एक अर्धवट वाक्य, की जे मी मुद्दाम अधोरेखित केले आहे ते असे की,
"तत्वज्ञानाविषयी सांगायचं म्हणजे तो दुर्बलांचाच एकमेव छंद आहे. नाही तर सामर्थ्यशाली करतात तो धर्म आणि कुटील आचरतात ती नीती, हीच स्थिती असते. दुर्बलांच्या वाट्याला राहता राहिलं ते तत्वज्ञान--धान्योल्लास संपल्यानंतर उरलेले कणजीवी क्षुद्र व्यवहार!"
आता QT मध्ये मनात रोज कांही विचार येतात त्यावर आणि एखाद्या महत्वाच्या नसल्यातरी त्या विचारानुरूप प्रसंगावर लिहावे वाटते कारण , रिमार्क्स मधील वाचूनदेखील, हे कसे करू, ते झेपेल का? हे प्रश्न निरर्थक असतात हे देखील माहित आहे. तो कृती आणि सरावाचा भाग आहे हे पटलेले आहे.
तर आज खेळ झाला नाही. त्यामुळे मागील कांही रिमार्क्स वाचत बसलो. आता पेशंट या नात्याने नेट वर बसता येणार नाही याची मला जाणीव आहेच त्यामुळे जुन्या वह्या धुंडाळल्या. त्याबद्दल उद्या निश्चित बोलेन. सध्या उद्या औरंगाबादवरून लहान बहिण येणार होती, तिचे विचार चालू होते. माझा एक सवा वर्षाचा छान भाचा आहे. मी तिथे तो पाच महिन्याचा असताना दोन अडीच महिने होतो. त्यामुळे मला त्याचा विशेष लळा आहे. आता तो दोन चार शब्द बोलतो.
मागच्या आठवड्यात तो आला असता, आम्ही दोघे अगदी शनिवार वाड्यापासून ते दूरदूर फिरलो. तो एकता माझ्याबरोबर राहतो चांगले तीनचार तासदेखील! त्यांच्या मते हा पोरखेळ नव्हे! खरे आहे थोडा आगावू आहे, पण फिरायला नाही म्हणत नाही. यावरून माझ्या बहिणीने मला टोमणा मारला की, 'अरे तुला अमेरिकेत नोकरी सहज मिळेल!' मी विचारले, कशाची? तर तिने हासोन सांगितले की, बेबीसिटरची म्हणून! त्यावर मी शांतपणे सांगितले की, हे बघ, मी अल्कोहोलिक असल्याने मी हे सहज करू शकतो.
कारण त्याला येतात ते चार शब्द पुन:पुन: म्हणणे, एखादा नवा शब्द शिकवणे, आणि त्याच त्याच कृतीवर तोच तोच प्रतिसाद देऊन आनंद व्यक्त करणे हा मला सहज जमते. कारण परत परत तीच तीच चूक करणे, परत परत दारू पिणे हेच मी कायम केले आहे. तेंव्हा जर तो एकदा कावकाव महाला तर शंभरदा कावकाव म्हणणे, एखादा कुत्रा दिसला तर भू भू करून तो आनंदाने तुम्हाला तो सांगतो तेंव्हा दोनचारदा भू भू केल्यावर तुम्ही कंटाळता, तसा मी कंटाळत नाही मी देखील तुम्ही करता तसे दुर्लक्ष करत नाही उलट दहादा भू भू करून कौतुक करतो, त्याने वीस वेळा केले तरी कारण तो माझा स्थायीभाव आहे!!
एखाद्या कृतीने त्याला आनंद वाटत असेल, उदा: बैठक मारताना 'जय बजरंगा' म्हणणे असेल तर ते मी वारंवार करतो. कारण वारंवार दारू पिणे जसे येते तसेच हे देखील आहे!!


नमस्कार,
मी वैशाली, प्रथमच तुम्हाला उत्तर लिहिते आहे. I hope that you find it satisfactory !
तुम्ही विचारलं आहेत की, विवेकाला धरून self talk काय असायला हवा होता? मी request करते की, त्याआधी तुम्ही घटनेच्या मागे तुमचा विचार काय होता ते पहा व त्याचा अभ्यास करा. कांही प्रश्न स्वतःला विचारा. उदा: मी जेंव्हा तिकडे गेलो तेंव्हा माझी अपेक्षा काय होती? त्याची
clarity
मनात होती का? कारण सुरुवातीचं (जाण्यामागचे) व नंतर झालेला त्याबद्दलचा analysis या मध्ये कांही विसंगती आहे का? मुख्यत: स्वतःच्या needs कळल्या आहेत का? मग त्या योग्य रीतीने satisfy करता येतील.
जेंव्हा नीती-अनीतीच्या कल्पना इतक्या स्पष्ट व ठाम डोक्यात असतात व त्याची जाणीवही असते तेंव्हा मग अनैतिक गोष्ट करणं म्हणजे conflict ला आमंत्रणच आहे. त्यामुळे conflict ही slippery place आहे तर मग addict असल्याचा awareness आहे हे म्हणण्याशी high risk behavior करणं हे विसंगत नाही का?
अजून एक विचारायचं होतं की, इथून गेल्यावर तुम्ही ज्या पद्धतीने वेळ spend करत होतात, are you satisfied with that? were you bored with life?what is the aim of your life? माझी अशी कल्पना आहे (कदाचित भाबडी असू शकेल) की, आयुष्यात जेंव्हा कांही purpose असतो तेंव्हा मजा येते. आपण बोलू.
वैशाली मडम
नमस्कार,
ह्या सुट्या कागदाचं हे उत्तर. तुमचा हा लहान मुलांबाबत तुम्ही व्यसनांच्या चुकांचा relation लावलाय ह विचार फारच original आहे! सुचणार नाही पटापट !
तर ह्या turn वर तुम्ही आहात का जेंव्हा realization झालंय की त्याच त्याच चुका आता परत करायच्या नाहीत. निदान त्यातरी नवीन करूयात.
तुमची (pg बद्दल ) कल्पना चांगली आहे. आपण मडमशी बोलू.
वैशाली मडम
No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....