सगळ्यात महत्वाचे ....आज तारीख ..वार.....इथपासून काहीही माहित नसणे, यासारखी किळसवाणी गोष्ट कोणतीच नसावी! ब्लॅक आउट याविषयी काळ रात्री इंटर नेट वर पाहिले, पण जे काही झाले ते पिल्यामुळे हे मान्य करावेच लागेल की, दारूमुळेच झाले. हे देखील लिहून ठेवण्याचे कारण की, पुन्हा कदाचित हे देखील आठवणार नाही.रात्री सिनेमा बघितला, आणि झोपलो...सकाळी लवकर जाग आली म्हणून फिरायला निघालो..
रविवार .....२३मे २०१०
रात्रभर नीट झोप नाही लागली, पण अॅसिडीटी वगळता इतर त्रास झाला नाही. तर, मागे लिहित होतो तेंव्हा नशेत होतो आणि डोके देखील दुखू लागले, म्हणून आता लिहित आहे आणि दुसरे कारण म्हणजे प्रत्यक्ष बोलण्यास संकोच वाटतो हेदेखील.
मनुष्याला असणा-या सर्व मर्यादा मला आहेत, हे मी विसरून जातो. आणि स्वतःविषयी कांही अस्वास्तव आणि उच्च कल्पना असतात, त्यामुळे जे करायचे, त्यात मजा येत नाही.
तुम्हाला कदाचित मटका हा जुगार माहित असेल, तेंव्हा तो किंवा इतर कोणत्याही प्रकारात कोणता आकडा येणार याबद्दल कांही अनुमान, तर्क लढवून सट्टेबाज, एखादा आकडा आज नक्की येणार असा लावतात.त्यापैकी एखादा येतो... ! पण आलेल्या आकड्याला तो कसा आलं हे छातीठोकपणे सांगणारे (आकडा फेल गेल्यावर देखील) असतात! तसे कांहीसे हे लिखाण आहे...यात समर्थन नाही, पण जसे घडले तसे सांगण्याचा प्रयत्न आहे.
तर आता इथे सांगतात तसे विचार येणे हे कांही गैर नाही, पण त्याला कॅरी करू नये असे देखील सांगतात, ते ऐकले नाही. आणि जी गोष्ट आपल्याला पटत नाही तिकडेच वळलो.
त्यादिवशी लवकर बाहेर पडल्यावर सकाळी पहिला (मॉर्निग शो) बघावा असे मनात होते पण वेळ होता (आणि पैसेही) म्हणून सहज लॉटरी कडे वळलो. त्यात पैसे येणे-जाणे चालूच होते, शेवटी जवळपास १५००रुपये जवळ होते.
यावेळी पुन्हा पटत नसणारा विचार बळावला आणि एका माडीकडे गेलो. पण त्यात मजा आली नाही तेंव्हा केंव्हातरी नशेत गेलो असेन, आता शुद्धीत मजा नाही म्हणून तो विचार झटकून सिनेमाला गेलो. मध्यंतरात सारंग सर देखील भेटले. त्यांना मी बो बोललो देखील...चेष्टेवारी! कदाचित त्यांच्यासोबत इथे आलो असतो तर हे टाळले असते...
तेथून अजून चांगल्याच्या शोधात परत एकदा दुसरीकडे गेलो. तेथे त्या बाईने बिअर पिण्याची मागणी केली. मी पीत नाही असे सांगितले. तेंव्हा मी अधिक पैसे देणार नाही या भावनेतून तिने मला कपडे ठेवोन घेण्याचे ठरवले, तेंव्हा मी सांगितले, की ,पैसे हवे तर घे पण आता मला इच्छा नाही!
तेथून निघताना खरेतर मला हसावे की रडावे हे कळत नव्हते, कारण हा एक अनुभव म्हणून सोडून देण्यास हरकत नव्हती, पण उमराणी सर म्हणतात तसे दारू पिण्याची ही योग्य वेळ आहे असे मीच म्हणू लागलो..हेच कारण योग्य आहे असे स्वतःला पटवून देऊ लागलो. एक क्वार्टर नंतर लागोपाठ पाच ..की सहा? ...पुन्हा नंतर काय केले, काय बोललो हे न आठवणे.. घरी कसा आलो ते माहित नसणे हा नेहमीचा अनुभव.. दुस-या दिवशी सकाळी पाच पासून पुन्हा तेच...सायंकाळी भावाने तुम्ही तेथे आहात असे सांगितले व आपल्याला कृपात जायचे असे सांगितले...
शेवटी पैसा, भावना काहींच माझ्या ताब्यात राहत नाहीत, सांभाळता येत नाहीत हेच खरे. पण त्याच वेळी झाल्या प्रकाराचा काहीही संबंध नसताना
बहिणीच्या लग्नाशी लावून तिला विनाकारण दुखावले. आणि भावाने तुला सर्व पैसा देतो असे सांगितले त्यावेळी, पैसा घेऊन मी परत कसाही वागायला मोकळा.. हा सुप्त विचार मनात डोकावत होता..पण हे शक्य देखील नाही कारण, या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता कृपामधील साडेपाच आणि घरी साडेपाच असे अकरा महिने एकंदर मला आतापर्यंतच्या आयुष्यात छान गेले होते. पण परत सर्व पूर्वीपासून सुरु करायचे अवघड वाटते आहे. त्यामुळे..
१ झाल्या प्रकाराबाबत किंवा पिण्यातील अपराधी भावनेतून (guilt ) मधून मी कसा बाहेर येऊ?
२ मी, घरी थांबू शकलो नसतो तेंव्हा इथे आलो आहे. आता परत मला इच्छेविरुद्ध इथे राहावे लागणार आहे त्याला अवघड वाटते.
३किती देखील विचार झटकला तरी मला आयुष्यात एखाद्या वेळेस तरी जास्त दिवस दारू थांबवणे जेल का? हे विचार येतात..कदाचित यामागे असुरक्षितता असू शकेल. कदाचित पुन्हा संधी मिळेल की नाही अशी भीती देखील वाटते.
मी दोन दिवसांखाली माझ्या वाढ जाणा-या आत्मकेंद्रीपणाबद्दल बोललो होतो. आणि आता सध्या तरी प्रामाणिक प्रयत्न शक्य वाटत नाहीत..असे विचार येतात. ते बदलावे कसे?
अजूनही हे लिहिताना खरे तर स्वतःविषयी घृणा वाटते. आरशात तोंडदेखील पाहावेसे वाटत नाही. तेंव्हा या सर्वांसाठी येथील रुटीन मध्ये काय करावे हे कळत नाही.
No comments:
Post a Comment